कैरीचं वर्षभर टिकणारे पारंपरिक लोणचं –

घरगुती चव, आठवणींची साथ!

    दिनांक :19-Jun-2025
Total Views |
mango pickle recipe कैरीचं लोणचं म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं आणि उन्हाळ्याच्या दिवसांची आठवण होते. पारंपरिक पद्धतीने केलेलं हे लोणचं वर्षभर टिकणारे असून त्याची चव दरवेळी ताजी आणि अप्रतिम लागते. स्वच्छतेची काळजी घेत, योग्य प्रमाणात मीठ, तेल आणि मसाला वापरून बनवलेलं हे लोणचं घरच्या घरी अगदी सहज करता येतं.
 
 

mango pickle recipe 
या mango pickle recipe लोणच्याचा स्वाद गरम भातासोबत, पोळी किंवा पराठ्यासोबत किंवा अगदी साध्या चपातीसोबतही विलक्षण लागतो. विशेष म्हणजे योग्य प्रमाणात मसाला आणि तेल वापरल्याने हे लोणचं कुठल्याही प्रकारच्या हवामानात बिघडत नाही आणि वर्षभर टिकते.आता उन्हाळ्यात कैऱ्या मिळाल्या की नक्की ही रेसिपी वापरून तुम्ही देखील आपल्या स्वयंपाकघरात लोणच्याचा खमंग सुवास पसरवा! वर्षभर टिकणारे पारंपरिक कैरीच्या लोणच्याची रेसिपी पाहू या. हे लोणचं योग्य पद्धतीने केल्यास आणि स्वच्छतेची काळजी घेतल्यास सहज वर्षभर टिकते.
 
 
साहित्यmango pickle recipe 
कैऱ्या (कमी आंबट व घट्ट असलेल्या) – 1 किलो
मेथी दाणे – 50 ग्रॅम (थोडे भाजून, थंड करून दरडीत ठेचून घ्यावेत)
मोहरी दाणे – 100 ग्रॅम (अर्धे बारीक पूड करून, अर्धे दाणे तसेच)
हळद – 2 टेबलस्पून
हिंग (कडक वासाचा) – 1 टेबलस्पून
लाल तिखट (लोणचं मसाला किंवा बायडगी) – 100 ते 125 ग्रॅम
मीठ – 150 ग्रॅम (लोणचं टिकवण्यासाठी भरपूर मीठ लागते)
तेल (गोडसर तिळाचं तेल / मोहरीचं तेल) – 400-500 मि.ली.

कृती
कैऱ्या तयार करणे
कैऱ्या स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने पुसून घ्या.
मधल्या गरासकट घट्ट कपातींचे तुकडे करा (बारीक न करता मध्यम आकाराचे तुकडे असावेत).
हे तुकडे एक दिवस सावलीत पसरवून पूर्ण कोरडे होऊ द्या.
मसाला तयार करणे
मेथी, मोहरी भाजून (हलकासा सुवास येईपर्यंत), थंड झाल्यावर पूड करून घ्या.
त्यात हळद, हिंग, तिखट आणि मीठ नीट मिसळा.
लोणचं भरवणे
एक कोरडा काचेचा किंवा सिरीमिक्सचा बरणी (जार) घ्या.
त्यात कैरीचे तुकडे आणि मसाला थरथर टाकत मिसळत जा.
हे करताना हात कोरडेच असावेत, ओलसरपणा अजिबात नको.
तेल गरम करणे
तेल गरम करून घ्या (मोहरी तेल वापरल्यास धूर निघेपर्यंत तापवा आणि थंड करा).
पूर्ण थंड झालेले तेल लोणच्यावर ओता, तेल तुकड्यांना पूर्ण बुडवेल इतकं असावं.
लोणचं मुरवणे
बरणी घट्ट झाकणाने बंद करा.
सुरुवातीचे 8-10 दिवस रोज बरणी हलवत जा म्हणजे मसाला आणि तेल सारखा मुरेल.
टीप
लोणचं करताना आणि वापरताना पाण्याचा थेंबही जाऊ देऊ नका.
स्वच्छ, कोरड्या चमच्यानेच लोणचं काढा.
तेल थोडं कमी वाटल्यास वरून पुन्हा गरम करून थंड केलेलं तेल घाला.
कडक उन्हात ठेवल्यास लोणचं चांगलं मुरतं.