शेगावच्या गजानन महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

७०० वारकऱ्यांचा सहभाग

    दिनांक :02-Jun-2025
Total Views |
बुलढाणा
Gajanan Maharaj Palakhi शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थान मंदिराच्या परिसरातून आज २ जून रोजी सकाळी विधिवत पूजनानंतर गजानन महाराज पालखी भव्य थाटात श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झाली. सातशे वारकऱ्यांसह तब्बल ५०० हून अधिक वारकरी, रथ, मेणा अश्व, टाळ, मृदूंगाचा गजर आणि नाम घोष यांच्या सततच्या आवाजात पालखी नागझरी येथील गोमाजी महाराज संस्थानकडे निघाली.
 

Gajanan Maharaj Palakhi 
 
 
राज्यभरातून Gajanan Maharaj Palakhi आषाढी एकादशीला विविध संतांच्या पालख्या दिंडीसह पंढरपूरला नेण्याची प्राचीन परंपरा वर्षानुवर्षे चालत आहे. शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानची पालखी परंपरा १९६८ पासून अखंड सुरु असून, यावर्षी ही परंपरा ५६ व्या वर्षात आहे. या दिंडीमुळे लोकांमध्ये विवेक, वैराग्य, भक्ती आणि ज्ञान यांचा बोध होतो.पालखीचा एकूण प्रवास १२७५ किलोमीटर असून, त्यापैकी शेगाव ते पंढरपूर ७२५ किलोमीटरचा आणि परतीचा प्रवास ५५० किलोमीटरचा आहे. आज सकाळी पालखीच्या प्रस्थानानंतर शहरातील विविध ठिकाणी वारकऱ्यांना फराळ, चहा आणि आरामदायी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
 
 
 
प्रवासादरम्यान Gajanan Maharaj Palakhi भजनी दिंडी, गज, अश्वास, चहा-फराळ, भोजन याची विशेष व्यवस्था केली गेली आहे. मुक्कामी थांबा धर्मशाळा, मंगल कार्यालये आणि शाळांमध्ये करण्यात आला आहे. तसेच वारकऱ्यांसाठी आवश्यक औषधोपचार व पिण्याच्या पाण्याची सोयही पुरवण्यात आली आहे.शेगाव संस्थानने या वर्षी पायी वारीसाठी बनारस येथील कारागिरांनी अत्यंत कलात्मक नक्षीकाम असलेली नवीन चांदीची पालखी तयार केली आहे, जी भक्तांच्या मनात भक्तीभाव अधिक वाढवित आहे.
 
 
पालखीच्या पुढील मुक्कामाची यादी:
२ जून: नागझरी (श्री संत गोमाजी महाराज संस्थान)
२ जून सायंकाळी: पारस (अकोला जिल्हा)
३ जून दुपारी: गायगाव
३ जून रात्री: भौरद
४ व ५ जून: अकोला
या भव्य पायी वारीचा शेवट ४ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे होणार आहे.शेगाव येथील गजानन महाराज पालखीने धर्म, श्रद्धा आणि भक्तीच्या या पायी प्रवासातून अनेक लहानगावांमध्ये आध्यात्मिक जागरूकता वाढविण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे.