नवी दिल्ली,
Vikram Sugumaran साऊथ सिनेसृष्टीतून एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध तमिळ दिग्दर्शक विक्रम सुगुमरण यांचे आज, २ जून रोजी, फक्त ४७ वर्षांच्या वयात हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाले आहे. मदुरईहून चेन्नईला प्रवास करत असताना बसमध्ये त्यांना हा धक्का बसला, ज्यामुळे सिनेविश्वात मोठा शोककळा पसरली आहे.
विक्रम Vikram Sugumaran सुगुमरण एका निर्मात्याला नवीन स्क्रिप्ट सादर करण्यासाठी मदुरईला गेले होते. मदुरईहून चेन्नईला बसने परतत असताना अचानक त्यांना छातीत तीव्र वेदना जाणवली. तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचे प्राणज्योत संपली.विक्रम सुगुमरण यांनी १९९९ मध्ये सहायक दिग्दर्शक म्हणून सिनेसृष्टीत प्रवेश केला. ‘मधा यानाई कूटम’ या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आणि प्रेक्षक तसेच समीक्षकांकडून त्यांना प्रशंसा मिळाली. त्यांच्या दिग्दर्शनाखाली ‘रावणा कोट्टम’ (२०२३) हा चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याने चांगली यशस्वी कामगिरी केली. सध्या त्यांनी ‘थेरम पोरुम’ या नवीन प्रोजेक्टवर काम सुरू होते, परंतु त्यांचे अकाली निधनामुळे हा प्रोजेक्ट अर्धवट राहिला आहे.
त्यांच्या Vikram Sugumaran मृत्यूनंतर साऊथ सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मिडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. विक्रम सुगुमरण यांच्या पाठीमागे पत्नी आणि मुले असून त्यांच्या कुटुंबावर या दुःखद घटनेचा मोठा आघात बसला आहे.सिनेसृष्टीतील त्यांच्या अभिनव कामगिरीला कायम स्मरण राहील आणि त्यांचे योगदान अनेक वर्षे आठवले जाईल.