धावपळीच्या जीवनशैलीत व्यायाम महत्त्वाचा : आ.श्याम खोडे

    दिनांक :02-Jun-2025
Total Views |
मंगरूळनाथ,
MLA Shyam Khode आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांनीच आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे, त्यासाठीच सहज साधने उपलब्ध व्हावीत, यासाठी जिल्हा क्रीडा विभागाकडून ओपन जिमची संकल्पना सुरू झाली आणि ती मंगरूळनाथ मध्ये रूजली. शहरातील नागरिकासाठी उभारलेल्या या जीमचा फायदा नक्की होईल. दररोजची कामे करत असताना स्वत:च्या आरोग्याकडेही नागरिकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन आमदार श्याम खोडे यांनी केले.
 

श्याम खोडे  
 
ते येथील जिल्हा परिषदेच्या मैदानात उभारण्यात येत असलेल्या ओपन जिमच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे, शहराध्यक्ष अभिषेक दंडे, सुनील मालपाणी, डॉ.दिलीप रत्नपारखी डॉ. रणजीत फुके, जिल्हा क्रीडा अधिकारी किशोर बोंडे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आ. खोडे म्हणाले, आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्यानंतर आपण रुग्णालयाची पायरी चढतो. त्यावेळी अख्खे कुटुंब हतबल होते. त्यासाठी घरातील दागदागिने आपल्याला प्रसंगी गहान ठेवावे लागते. त्यामुळे आरोग्य चांगले व्हावे यासाठी व्यायामाची गरज आहे.MLA Shyam Khode यासाठी क्रीडा विभागाकडून शहरातील जिल्हा परिषदेच्या मैदानात जिम उभारली जात आहे.अशी माहीती यावेळी क्रीडा विभागाकडुन देण्यात आली.