पालखी मार्गावर चार ड्रोन, सात हजार पोलिसांचा बंदोबस्त

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

    दिनांक :20-Jun-2025
Total Views |
सोलापूर,
Ashadhi Ekadashi 2025  यंदाच्या आषाढी वारीत पालखी मार्गावर सुरक्षा व्यवस्थेसाठी विशेष तजवीज करण्यात आली असून, चार ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे पालखी मार्गावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवणे, भाविकांची संख्या मोजणे, तसेच चेन स्नॅचिंग व अन्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केला जाणार आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी ही माहिती दिली.
 
 
Ashadhi Ekadashi 2025
फुलारी गेल्या चार दिवसांपासून सोलापूर ग्रामीण पोलिस दलाची आणि पुणे ते सोलापूर दरम्यानच्या पालखी मार्गाची पाहणी करत आहेत. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी सुरक्षेची आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा सात हजार पोलिसांचा टप्प्याटप्प्याने बंदोबस्त राहणार असून, पोलिस महासंचालक कार्यालयाकडून बॉम्बशोधक पथक, एसआरपीएफ पथक यांचीही तैनाती केली जाणार आहे. हा बंदोबस्त पालखीच्या प्रारंभापासून ते समारोपापर्यंत असणार आहे. तसेच यंदा वारीसोबत जनरेटरचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
दर्शन Ashadhi Ekadashi 2025  व्यवस्थेत बदल वारकऱ्यांच्या सोयीसाठी आणि गर्दी टाळण्यासाठी मंदिर परिसरातील दर्शन मार्गात बदल करण्यात आला आहे. दर्शनानंतर भाविकांना मंदिराला वळसा घालून तुकाराम भवनमार्गे, पश्चिम घाटमार्गे बाहेर जाण्याचे नियोजन आहे. यासाठी परिसरात बॅरिकेड्स लावण्यात येणार आहेत.नदीपात्रातील सुरक्षेसाठी उपाय नदीपात्रात असलेल्या बोटी आणि होडीचालकांना मान्यता देणे, त्यांचे प्रशिक्षण आणि सुरक्षेचे साहित्य याची तपासणी केली जाणार असल्याचेही फुलारी यांनी सांगितले.पोलिसांच्या निवासासाठी नवी इमारत वारी काळात बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिसांच्या निवासासाठी पंढरपूर येथे चार मजली इमारत उभारण्यात येणार असून, डॉरमॅट्रीसारखी सुविधा असलेल्या या इमारतीसाठी १० कोटींचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.