...अखेर ‘त्या’ बारा वर्षीय मुलीने बाळाला दिला जन्म
बलात्कारातून मुलगी गर्भवती : पालक पुन्हाउच्च न्यायालयात धाव घेणार
दिनांक :20-Jun-2025
Total Views |
नागपूर,
Girl becomes pregnant after rape बारा वर्षीय मुलगी बलात्कारातून गर्भवती झाली आणि तिने उच्च न्यायालयात गर्भपात करण्यासाठी याचिका दाखल केली हाेती. मात्र, अकाेला वैद्यकीय विभागाने आठ महिन्यांच्या गर्भवतीचा गर्भपात करण्याऐवजी सुरक्षितपणे बाळंतपण केले. या मुलीने एका गाेंडस मुलाला जन्म दिला असून, आई आणि बाळ दाेघांची प्रकृती सध्या स्थिर आहे. काही दिवसांत त्यांना रुग्णालयातून सुटी मिळण्याची शक्यता आहे.
अकाेला जिल्ह्यातील बाळापूर येथील एका 25 वर्षीय युवकाने पीडित 11 वर्षीय मुलीला वेगवेगळी आमिष दाखवली. तिला घरात एकटी असताना वयाच्या अकराव्या वर्षांपासूनच तिच्यावर लैंगिक अत्याचार करायला लागला. अल्पवयीन मुलीवर सहा महिन्यांपर्यंत लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे ती गर्भवती राहिली. घाबरल्यामुळे तिने गर्भवती झाल्याबाबत आई-वडिलांना सांगितले नाही. शेवटी तिने पाेटदुखीचा त्रास असल्याचे सांगत रुग्णालयात गेली असता डाॅक्टरांनी मुलगी गर्भवती असल्याचे स्पष्ट केले. मुलीच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. आठव्या वर्गाची असलेल्या मुलीला घेऊन पालक बाळापूर पाेलिस ठाण्यात गेले. Girl becomes pregnant after rape तेथे त्यांनी तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन मुलीशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या युवकाची माहिती समाेर आली. पाेलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन युवकाला अटक केली. त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची कबुली दिली.
याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी उच्च न्यायालयात मुलीच्या गर्भपातासाठी याचिका दाखल केली हाेती. मेडिकल बाेर्डाच्या तपासणीनंतर स्पष्ट झाले की, आठ महिन्यांच्या गर्भवतीचा गर्भपात केल्यास मुलीच्या जिवाला गंभीर धाेका हाेऊ शकताे. Girl becomes pregnant after rape त्यामुळे, हायकाेर्टाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे व सचिन देशमुख यांच्या निर्देशाप्रमाणे पीडित मुलगी व तिच्या पालकांकडून हमीपत्र घेत गर्भपातास परवानगी दिली हाेती. मात्र, वैद्यकीय कारणांमुळे अखेर बाळंतपणाचा मार्ग स्वीकारण्यात आला. मुलीने गाेंडस बाळाला जन्म दिला. पुढील कारवाई पाेलिस विभाग करीत आहे. ही याचिका पीडितेच्या पालकांनी अॅड. साेनिया गंजभिये यांच्या र्माफत दाखल केली हाेती. राज्य सरकारर्ते अॅड. देवेंद्र चव्हाण यांनी बाजू मांडली. यामध्ये अॅड. एच. डी. मराठे यांनी त्यांना सहाय्य केले.