स्पायडर-मॅनचा पंजाबी डब ट्रेलर व्हायरल

नेटफ्लिक्सवर चाहत्यांची धमाल प्रतिक्रिया

    दिनांक :20-Jun-2025
Total Views |
Spider-Man २०१२ मध्ये प्रदर्शित झालेला हॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट ‘द अमेझिंग स्पायडर-मॅन’ पुन्हा चर्चेत आला आहे. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट हिंदी, इंग्रजी, पंजाबी आणि इतर भाषांमध्ये उपलब्ध आहे. सध्या याच्या पंजाबी डब ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडिओ इतका मजेदार ठरला आहे की, तो पाहिल्यानंतर प्रेक्षक हसू आवरू शकलेले नाहीत.
 
 

Spider-Man  
पंजाबी ट्रेलरने केला धुमाकूळ
 
 
नेटफ्लिक्सवर ‘द अमेझिंग स्पायडर-मॅन’चा पंजाबी डब ट्रेलर रिलीज झाला असून त्याची लांबी २ मिनिटे ३४ सेकंद आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १ लाख १९ हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. ट्रेलरमधील संवाद, खास करून पंजाबी भाषेतील टोन आणि पार्श्वसंगीतामुळे गंभीर दृश्येही प्रेक्षकांना विनोदी वाटत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर याचे मीम्स आणि जोक्सही शेअर केले जात आहेत.
चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया
 
 
ट्रेलरवर प्रेक्षकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले, "गंभीर दृश्ये देखील मजेदार दिसतात." दुसऱ्याने म्हटले, "हिंदी डब सर्वोत्तम आहे, पण पंजाबी..." आणि त्यासोबत हसणारे इमोजी टाकले. आणखी एका युजरने लिहिले, "कोणालाही हे अपेक्षित नव्हते." तसेच एका प्रेक्षकाने पार्श्वसंगीतालाही मजेदार म्हटले. दुसरा युजर म्हणाला, "नंबर वन नेटफ्लिक्स इंडिया. बल्ले बल्ले ओ. माझा ही आ गया."

चित्रपटाची थोडक्यात माहिती
 
 
‘द Spider-Man अमेझिंग स्पायडर-मॅन’ हा मार्वल कॉमिक्समधील प्रसिद्ध सुपरहिरो स्पायडर-मॅन वर आधारित आहे. या चित्रपटात अँड्र्यू गारफिल्ड याने पीटर पार्कर/स्पायडर-मॅनची भूमिका साकारली आहे. तसेच, दिवंगत अभिनेता इरफान खान यांचाही महत्त्वाचा रोल आहे. हा चित्रपट त्या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा सातवा चित्रपट ठरला होता आणि त्याने जगभरात सुमारे ७५८.७ दशलक्ष डॉलर (६५ अब्ज रुपयांहून अधिक) कमाई केली होती.
नेटफ्लिक्सवर हा चित्रपट अनेक भाषांमध्ये उपलब्ध असल्याने प्रेक्षकांना आता वेगवेगळ्या डबिंगचा अनुभव घेता येत आहे. पण पंजाबी डब ट्रेलरने तर वेगळ्याच प्रकारचा हास्यस्फोट घडवला आहे!