नागपूर,
Pandharpur Wari : आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या वारी करिता नागपूर - मिरज - नागपूर दरम्यान चार विशेष गाड्या चालविण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. आषाढी एकादशी निमित्त ६ रोजी पंढरपूर येथे होणार्या यात्रेकरिता यात्रेकरूंची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे नागपूर आणि मिरज दरम्यान चार विशेष गाड्या (गाडी क्र. ०१२०५/०१२०६) चालविण्यात जाणार आहेत. या गाड्या ट्रेन ऑन डिमांड योजनेअंतर्गत १.३ भाडे दर योजना राबवून चालविण्यात येतील.

गाडी क्र. ०१२०५ नागपूर ते मिरज विशेष रेल्वे ४ जुलै आणि जुलै रोजी सकाळी ८.५० वाजता नागपूर स्थानकावरून प्रस्थान करील व दुसर्या दिवशी ११.५५ वाजता मिरज स्थानकावर आगमन करेल. गाडी क्र. ०१२०६ (मिरज ते नागपूर विशेष)६ जुलै आणि ७ जुलै रोजी दुपारी १२.२५ वाजता मिरज स्थानकावरून प्रस्थान करील व दुसर्या दिवशी १२.५५ वाजता नागपूर स्थानकावर आगमन करेल. या विशेष ट्रेनला वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा,मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला,म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, महांकाळ, सलगर आणि मिरज असे थांबे देण्यात आले आहे.