अरुणा ईरानी यांचा भावनिक खुलासा

21 Jun 2025 16:23:08
मुंबई,
Aruna Irani बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा ईरानी यांनी आपल्या खासगी आयुष्यातील एक मोठा खुलासा केला आहे. अनेक वर्षे गुप्त ठेवलेली आपल्या विवाहाची गोष्ट त्यांनी अलीकडेच उघड केली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक कुकू कोहली यांच्यासोबतचे आपले नाते आणि विवाह याविषयी त्यांनी मनमोकळेपणाने सांगितले आहे.
 
 

Aruna Irani 
एका मुलाखतीत बोलताना अरुणा ईरानी म्हणाल्या की, “मी कधीच कोणाचे घर तोडण्यासाठी नातं जोडले नाही. माझं आणि कुकू कोहली यांचं नातं हे समजूतदारपणा आणि भावना यावर आधारलेलं होतं.” त्यांनी सांगितले की, “मी ४० वर्षांची असताना कुकू कोहली यांच्याशी गुपचुप विवाह केला. कारण ते आधीच विवाहित होते. ही गोष्ट मी अनेक वर्षे कोणालाही सांगितली नाही, कारण मी कोणाच्याही भावना दुखावू इच्छित नव्हते. त्यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झाल्यावरच मला माझ्या विवाहाविषयी उघडपणे बोलायची हिंमत झाली.”
 
 
समाजातील Aruna Irani  ‘दुसरी बाई’ हा टॅग का लावला जातो यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अरुणा ईरानी म्हणाल्या, “कोणताही संसार तुटतो तेव्हा सगळ्या बोटा स्त्रीकडेच का उठतात? पुरुषाची जबाबदारी का घेतली जात नाही? बायकांनी कायम दुसऱ्या स्त्रीला दोष द्यायचा आणि पतीला काहीच विचारायचं नाही. माझं नातं कधीच कोणाला दुखवण्यासाठी जोडलेलं नव्हतं. यात फक्त भावना होत्या. बाहेरचे लोक काहीही बोलू शकतात, पण नात्यात तिसरा व्यक्ती का आणि कसा आला, हे त्या दोघांनाच ठाऊक असतं.”
 
 
आई Aruna Irani  न होण्याचा निर्णयही त्यांनी याच कारणामुळे घेतल्याचं सांगितलं. अरुणा ईरानी म्हणाल्या, “मी कधी आई होण्याचा प्रयत्नच केला नाही, कारण मला माझ्या पतीला रात्री-बेरात्री फोन करता येत नव्हता. जर मुलानं विचारलं असतं की बाबा कुठे आहेत, तर मी काय उत्तर दिलं असतं? म्हणूनच मी आई होण्याचा निर्णयच घेतला नाही. ही माझी स्वतःची निवड होती.”अरुणा ईरानी यांनी आपल्या नात्याविषयीचे गोडवेदना सांगताना अनेकांच्या मनाला स्पर्श केला आहे. त्यांच्या या प्रामाणिक वक्तव्यामुळे अनेक लोकांना नात्यांकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळू शकतो.
Powered By Sangraha 9.0