मोदी सरकारच्या 11 वर्षांत आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक क्रांती : आ. डॉ. मिलिंद नरोटे

21 Jun 2025 17:34:56
गडचिरोली, 
Dr. Milind Narote मोदी सरकारच्या 11 वर्षांतील आरोग्य क्षेत्रातीलन ही ऐतिहासिक क्रांती असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी केले.यावेळी केंद्र सरकारच्या आरोग्यविषयक धोरणांवर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘बुद्धिजीवी संमेलन’ स्वामी विवेकानंद ज्युनिअर सायन्स कॉलेज, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
 
milind narote 
 
 
पुढे बोलताना ते म्हणाले, मोदी सरकारच्या 11 वर्षांच्या कार्यकाळात देशातील आरोग्य क्षेत्राला अभूतपूर्व चालना मिळाली आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यावर केंद्र सरकारने विशेष भर दिला आहे. त्यामुळे गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातही दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचू लागली आहे. गडचिरोली जिल्ह्यात मोदी सरकारच्या कार्यकाळात वैद्यकीय शिक्षणाच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले असून, येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना झाली आहे. त्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची मोठी संधी उपलब्ध झाली असून जिल्ह्यातील आरोग्यसेवेला देखील नवे बळ मिळाले आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात देशभरात नवीन 16 एम्स संस्थांची घोषणा करून काम सुरू करण्यात आले आहे. 2014 पूर्वी देशात केवळ 7 एम्स अस्तित्वात होते. मात्र मोदी सरकारच्या प्रयत्नांतून ही संख्या 23 पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे उच्च दर्जाच्या उपचार सुविधांचा देशभर विस्तार झाला असून सामान्य नागरिकांना त्यांच्या राज्यातच आधुनिक उपचार घेणे शक्य झाले आहे.Dr. Milind Narote यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ चा विशेष उल्लेख केला. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय तसेच खासगी मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये मोफत उपचार सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे गरीब व गरजू रुग्णांना लाखो रुपयांचा आर्थिक दिलासा मिळाला असल्याचे ते म्हणाले.
या संमेलनाला माजी खासदार डॉ. अशोक नेते, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, बाबुराव कोहळे, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, गोविंद सारडा, सदानंद कुथे, योगिता पिपरे, अनिल पोहनकर, गीता हिंगे, रेखा डोळस, डॉ. संगीता रेवतकर, डॉ. चंदा कोडवते, अनिल कुनघाडकर, दत्तू सुत्रपवार, डॉ. भारत खटी, मुक्तेश्‍वर काटवे, मधुकर भांडेकर यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0