कारंजा लाड,
suicide attempts मागील काही दिवसापासून विष प्राशन करण्याच्या घटनात झालेली लक्षणीय वाढ चिंताजनक आहे.कारंजा तालुयात मागील दोन दिवसात तिघांनी विष प्राशन करून मृत्यूला कवटाळण्याचा प्रयत्न केला. मात्र यामागील ठोस कारणे कळले नाही. जीवनात चढ उतार हे येतच असतात. परंतु काही जन मात्र जीवनातील या चढ उतारांना सामोरे न जाता आत्महत्येचा मार्ग निवडून विषाचा घोट घेतात. कारंजा तालुयात १९ व २० जून या दोन दिवसात तिघांनी विषाचा घोट घेतला.
त्यानंतर त्यांना कुटुंबीयांनी उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यातील दोघांवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले तर एकावर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालयातील नोंदीवरून प्राप्त झाली आहे. १९ जून रोजी दुपारी अडीच वाजता मूर्तिजापूर तालुयातील रसीगायरान येथील एका २८ वर्षीय युवकाने कारंजा बायपास परिसरात विष प्राशन केल्याचे कुटुंबीयांनी उपचारादरम्यान सांगितले. तर त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता कारंजा तालुयातील शेलुवाडा येथील ३५ वर्षीय महिलेने विषाचा घोट घेतला. दुसर्या दिवशी २० जून रोजी रात्री १० वाजताच्या दरम्यान तालुयातील मनभा येथील १७ वर्षीय मुलाने देखील विष प्राशन केले. यातील दोघांना अकोला येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. तर एकावर उपचार सुरू आहेत.
मागील काही दिवसापासून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या घटनात वाढ झाली आहे. आजारपण, डोईजड कर्ज ,प्रेमप्रकरण आणि व्यसन यासह इतर काही कारणे यामागे असल्याचे बोलल्या जात आहे.suicide attempts या घटनांना आळा घालण्यासाठी या मागील कारणे शोधून त्यांचे मानसिक समुपदेशन करण्याची गरज निर्माण झाली आहे.