अनिल कांबळे
नागपूर,
DG Loan पाेलिस कर्मचाऱ्यांचे अर्धेअधिक आयुष्य पाेलिस वसाहतीतील निवासी क्वार्टर्समध्ये जाते. त्यामुळे नाेकरीच्या शेवटच्या टप्प्यात अनेक पाेलिस कर्मचारी स्वतःचे घर असावे, यासाठी प्रयत्नरत असतात. त्यासाठी शासनाच्या ‘डीजी लाेन’ (गृहबांधणी अग्रिम) याेजनेचा लाभ मिळवून घराचे स्वप्न पूर्ण करण्याची अपेक्षा असते. मात्र, सध्या राज्यातील शेकडाे पाेलिस कर्माचारी डीजी लाेन मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. परंतु, ऑगस्ट 2023 पासून याेजनेची प्रक्रियाच राेखण्यात आलेली आहे. त्यामुळे 1 हजार700 पेक्षा जास्त काेटींचे प्रस्ताव धूळ खात पडून आहेत. त्यामुळे शेकडाे कर्मचारी डीजी लाेन कधी मंजूर हाेणार, असा प्रश्न विचारत आहेत.
राज्य पाेलिस दलातील प्रत्येक कर्मचाऱ्यांना पाेलिस वसाहतीत क्वाॅर्टर मिळते. माेजक्या जागेवर असलेल्या घरात कर्मचाèयांना कुटुंबासह राहावे लागते. कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढल्यानंतर घर लहान वाटायला लागते. पाेलिस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना अर्धेअधिक आयुष्य पाेलिस वसाहतीतील जुन्या व वारंवार डागडुजी केलेल्या घरात घालवावे लागते. त्यामुळे प्रत्येक पाेलिसांचे स्वतःचे हक्काचे घर असावे, असे स्वप्न असते. पाेलिसांना सहज गृह कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी गृहमंत्रालयाने सकारात्मकता दाखवून ‘डीजी लाेन’ (गृहबांधणी अग्रिम) याेजना काढली. पाेलिसांना सहज गृहकर्ज उपलब्ध करून त्यांच्या घर उभारणीसाठी ‘डीजी लाेन’ संकल्पना राबविण्यात येत आहे. या याेजनेमुळे आतापर्यंत राज्यातील शेकडाे पाेलिस कर्मचाèयांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले. सध्या राज्यातील 5 हजार 700 पेक्षा जास्त पाेलिस कर्मचाऱ्यांनी ‘डीजी लाेन’साठी अर्ज केले आहेत. परंतु, ऑगस्ट 2023 पासून याेजनेची प्रक्रियाच राेखण्यात आलेली आहे. त्यामुळे 1,768 काेटींचे प्रस्ताव धूळ खात पडून आहेत. परिणामी, पाेलिसांना हक्काचे घर बांधण्याच्या प्रयत्नाला खिळ बसली आहे. पाेलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराच्या बेसिकच्या 125 पट कर्ज रक्कम मंजूर हाेते. यात कर्ज रकमेप्रमाणे व्याजदर ठरताे. विशेष म्हणजे, ही सर्व रक्कम एकरकमी जमा हाेते. याच्या वसुलीत कमाल 20 वर्षात प्रथम 192 मासिक हप्त्यांत मूळ अग्रीम व नंतर 48 मासिक हप्त्यांत व्याज घेण्यात येत, अशी माहिती एका पाेलिस हवालदाराने दिली.
कर्ज मंजुरीसाठी दीड हजार काेटींची गरज
पाेलिस कर्मचाऱ्यांना डीजी लाेन मंजूर करण्यासाठी जवळपास दीड हजार काेटींची गरज आहे. ऑगस्ट 2024 पर्यंत 3518 पाेलिसांच्या अर्जासाठी 1 हजार 130 काेटी 56 लाख 17 हजार काेटींचे कर्ज उभारणीसाठी विनंती करण्यात आली हाेती. 31 डिसेंबर 2024 पर्यंत प्राप्त 1,193 अर्जासाठी 4 हजार 25 काेटी 1 लाख अशी एकूण 4,711 पाेलिसांसाठी 1,555 काेटी 87 लाख 56 हजार रकमेची आवश्यकता आहे.DG Loan अशी एकूण 1,768 काेर्टीच्या मान्यतेसाठी विनंती अद्याप शासन दरबारी प्रलंबित असल्याची माहिती आहे.
स्वतःचे हक्काचे घर असावे यासाठी ‘डीजी लाेन’साठी अर्ज केला हाेता. मात्र, अद्याप गृहकर्ज मंजूर झाले नाही. कर्ज मंजूर हाेताच घर घेण्याबाबत विचार करीत आहे, अशी प्रतिक्रिया नागपूर पाेलिस आयुक्तालयातील एका पाेलिस हवालदाराने दिली.