मराठी अभिनेता तुषार घाडीगावकरचे निधन

आत्महत्येने सिनेविश्वात शोककळा

    दिनांक :22-Jun-2025
Total Views |
मुंबई,
Tushar Ghadigaonkar मराठी टेलिव्हिजन आणि सिनेसृष्टीत अनेक छोट्या पण लक्षवेधी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा अभिनेता तुषार घाडीगावकर याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तुषार याच्या टोकाच्या निर्णयामुळे सिनेविश्वात खळबळ उडाली असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
 
 

 Tushar Ghadigaonkar 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तुषार गेल्या काही दिवसांपासून काम न मिळाल्याच्या मानसिक तणावाखाली होता. याच कारणामुळे त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. तो मुंबईतील भांडुप परिसरात वास्तव्यास होता. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून, पुढील चौकशी सुरू आहे.
 
 
 
अभिनेता Tushar Ghadigaonkar  अंकुर वाढवे याने सोशल मीडियावर तुषारच्या निधनाची बातमी शेअर करत दुःख व्यक्त केले. “मित्रा का? कशासाठी? काम येतात जातात! आपण मार्ग काढले पाहिजेत, पण आत्महत्या हा मार्ग नाही. मान्य आहे, सध्याची परिस्थिती विचित्र आहे, पण हा निर्णय असू शकत नाही. तुषार, तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो...” अशी भावनिक प्रतिक्रिया त्याने दिली आहे. अनेक नेटकऱ्यांनीही सोशल मीडियावर तुषारला श्रद्धांजली वाहिली आहे.तुषार घाडीगावकर याने अनेक मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली. ‘लवंगी मिरची’, ‘मन कस्तुरी रे’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकांमधून तो प्रेक्षकांसमोर आला होता. याशिवाय ‘भाऊबळी’, ‘उनाड’, ‘झोंबिवली’ अशा चित्रपटांतही त्याने काम केले होते.तुषारच्या अचानक निधनामुळे मराठी सिने-सृष्टीत शोककळा पसरली आहे.