विराट कोहली आणि जिनिलिया डिसूझा यांची वादग्रस्त जाहिरात पुन्हा चर्चेत

विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

    दिनांक :22-Jun-2025
Total Views |
मुंबई,
Virat Kohli Genelia D’Souza भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतो. सध्या तो अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासोबत आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे. मात्र, एका मुलाखतीत विराटने अभिनेत्री जिनिलिया डिसूझा हिचा त्याचा ‘क्रश’ असल्याचे सांगितले होते. विराट आणि जिनिलिया यांनी अनेक जाहिरातींमध्ये एकत्र काम केले असून त्यातील एक जाहिरात प्रचंड वादग्रस्त ठरली होती. हीच जाहिरात सध्या पुन्हा चर्चेत आली आहे.
 
 

Virat Kohli Genelia D’Souza ad 
विराट आणि जिनिलिया यांच्या त्या वादग्रस्त जाहिरातीत विराट पायलटच्या भूमिकेत तर जिनिलिया फ्लाइट अटेंडंटच्या भूमिकेत दिसते. जाहिरातीच्या कथानकात विराट विमान चालवत असतो आणि त्याचा सह-पायलट वॉशरूमला जातो. त्यावेळी जिनिलिया कॉकपिटमध्ये येते आणि दोघांमध्ये रोमान्स सुरु होतो. या दरम्यान विमानातील प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होतो, अशी दृश्ये या जाहिरातीत दाखवण्यात आली होती. जनहिताचा विचार करून ही जाहिरात प्रदर्शित होताच लगेचच बंदी घालण्यात आली होती.
 
 
ही जाहिरात Virat Kohli Genelia D’Souza  सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. एका रेडिट युजरने ती जाहिरात शेअर केली आणि त्यानंतर सोशल मीडियावर ती व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, या जाहिरातीच्या शेअरिंगचा संदर्भ १२ जून रोजी अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या भीषण विमान अपघाताशी जोडला जात आहे. या अपघातात तब्बल २७० जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत केवळ एक प्रवासी चमत्कारिकरीत्या बचावला. अपघात इतका भीषण होता की ज्या रेसिडेन्सीवर विमान कोसळले, तेथील काही डॉक्टरांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
 
 
या घटनेनंतर Virat Kohli Genelia D’Souza  सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एका युजरने लिहिले, “जाहिरातीवर बंदी घातली हेच योग्य झाले, नाहीतर अनर्थ ओढवला असता.” दुसऱ्या युजरने म्हटले, “पूर्वी रस्ते आणि रेल्वे अपघात व्हायचे, आता विमान अपघातही होत आहेत…” तर तिसरा युजर म्हणाला, “प्रशासनाचे बेजबाबदार धोरण याला कारणीभूत आहे…”अधिकृत आकडेवारीनुसार, अहमदाबाद विमान दुर्घटनेत आतापर्यंत २३१ मृतदेहांची डीएनए ओळख पटली असून २१० मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. मृतांमध्ये १५५ भारतीय, ३६ ब्रिटिश, सात पोर्तुगीज, एक कॅनेडियन आणि नऊ स्थानिक नागरिकांचा समावेश आहे.दरम्यान, विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या जाहिरातींवर कडक नियंत्रण ठेवण्याची मागणीही सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे.