काशीपूर (ओडिशा),
inter-caste marriage प्रेम केल्याच्या किंमतीत डोक्यावरील केस गमवावे लागले! ओडिशातील रायगड जिल्ह्यातील काशीपूर ब्लॉकच्या बेगनगुडा गावात एका प्रेमविवाहाने जातीय अंधश्रद्धांना भयंकर रूप दिले. गावातील अनुसूचित जमातीतील तरुणीने दुसऱ्या गावातील अनुसूचित जातीच्या युवकाशी विवाह केला आणि त्यामुळे तिच्या कुटुंबावर अमानवी दबाव आणण्यात आला.
गावकऱ्यांनी संपूर्ण कुटुंबावर शुद्धीकरणासाठी प्राण्याची बलि देणे, मुंडन करणे आणि जातीत पुन्हा सामावून घेण्यासाठी "शुद्धी प्रक्रिया" पार पाडण्याचा अटळ फतवा जारी केला. समाजाच्या दबावामुळे कुटुंबातील तब्बल ४० जणांना मुंडन करून घ्यावे लागले. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओही समोर आला असून तो पाहून अनेकांच्या अंगावर शहारे आले आहेत.घटनेची माहिती मिळताच काशीपूरचे बीडीओ विजय सोय यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रशासनाकडून दोषींवर कारवाईचे आश्वासन देण्यात आले आहे.आजच्या प्रगत तंत्रज्ञान आणि आधुनिक विचारांच्या काळातही अशा प्रकारच्या जातीय मानसिकतेचे घटस्फोट झाले नाहीत, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. प्रेम हा गुन्हा नव्हे, तरी त्याला अशी शिक्षा दिली जात आहे!