'ऑपरेशन सिंधू' अंतर्गत १६० भारतीय नागरिक इस्रायलमधून बाहेर

23 Jun 2025 18:06:27
अम्मान (इस्रायल-जॉर्डन),
Operation Sindhu इस्रायल-इराण युध्दाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची पहिली तुकडी भारतात सुखरूप परतली आहे. 'ऑपरेशन सिंधू' अंतर्गत १६० भारतीय नागरिकांना इस्रायलमधून बाहेर काढण्यात आले असून, अम्मानहून (जॉर्डन) दिल्लीकडे रवाना झालेले विशेष विमान आज भारतात पोहोचले.या प्रवाशांमध्ये महिलांपासून विद्यार्थ्यांपर्यंत अनेकजण सामील होते. दिल्लीकडे प्रस्थान करताना विमानात ‘भारत माता की जय’ च्या घोषणा दिल्या गेल्या.
 
 

160 Indian citizens evacuated from Israel under Operation Sindhu 
इस्रायलचे Operation Sindhu हवाई क्षेत्र बंद असूनही आणि सर्व व्यावसायिक उड्डाणे स्थगित असतानाही, इस्रायल आणि जॉर्डनमधील भारतीय दूतावासांनी संयुक्त प्रयत्न करून ही मोहीम यशस्वी केली.भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अम्मान ते नवी दिल्ली दरम्यान विशेष विमानांची व्यवस्था केली. इस्रायलच्या दक्षिण भागात अजूनही बरेच भारतीय अडकले असल्याने, त्यांच्यासाठी इजिप्तहून विमाने पाठवण्याची योजना सुरू आहे.या तुकडीत हिब्रू विद्यापीठातील भारतीय संशोधक अरविंद शुक्ला यांचा समावेश होता. त्यांनी भारत सरकार आणि दूतावासाच्या प्रयत्नांचे कौतुक करताना सांगितले की, "ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय सुनियोजित आणि सुरक्षित होती. दूतावासाने आमची उत्कृष्ट काळजी घेतली."इस्रायलमध्ये सध्या सतत सायरनच्या आवाजामुळे आणि क्षेपणास्त्रे-ड्रोन हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे भारतीय नागरिक वारंवार बंकर व सुरक्षित खोल्यांमध्ये आश्रय घेत होते.
 
 
 
 
डेटाबेस तयार
 
 
भारतीय दूतावासाने विशेष पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांची नोंदणी करून डेटाबेस तयार केला. वैद्यकीय आणीबाणी, लहान मुले, महिला आणि विद्यार्थ्यांच्या आधारावर स्थलांतराचे प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आले.संपर्कासाठी दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी फोन व ई-मेलच्या माध्यमातून प्रवाश्यांशी संपर्क साधून त्यांना विशेष विमान, प्रवासाचा वेळ व सुविधा यांची माहिती दिली.या मोहिमेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः लक्ष ठेवून होते आणि त्यांनी नागरिकांच्या सुरक्षेबाबत नियमित अपडेट्स घेतले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
 
 
इस्रायल व जॉर्डन सरकारचे सहकार्य आणि जॉर्डनमधील भारतीय दूतावासाच्या समन्वयामुळे ही मोहीम यशस्वी झाली. अम्मान विमानतळावर भारतीय नागरिकांचे स्वागत करण्यात आले व त्यांच्या भारतात परतीचा प्रवास सुलभ करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0