फळपीक विमा योजना मृग बहारला ३० जून पर्यंत मुदतवाढ

    दिनांक :23-Jun-2025
Total Views |
वर्धा,
Fruit Crop Insurance Scheme पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग बहार २०२५-२६ मध्ये सहभागी होण्यासाठी ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक असणे अनिवार्य असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.
 
 
Fruit Crop Insurance Scheme
 
शेतकर्‍यांच्या फळपिकांना हवामान धोयांपासून विमा संरक्षण देऊन आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत हवामानावर आधारित फळपीक विमा योजना वर्ष २०२४-२५ व २०२५-२६ या वर्षांमध्ये मृग व आंबिया बहाराकरिता जिल्ह्यातील संत्रा, मौसंबी, लिंबू आणि केळी या फळ पिकांकरिता अधिसूचित क्षेत्रामध्ये योजना राबविण्यात येत आहे. Fruit Crop Insurance Scheme मृग बहार योजना ही अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठीच असणार आहे. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकर्‍यांना ही योजना ऐच्छिक राहील. खातेदारांव्यतिरित कुळाने किंवा भाडे पट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेऊ शकतात. या योजनेतंर्गत ३० ते ३५ टके पर्यंतचा अतिरित ५ टके विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्वीकारला असून ३५ टयांवरील विमा हप्ता राज्यशासन व शेतकरी यांनी ५०:५० टके प्रमाणे भरावयाचे आहे.
 
  
संत्रा व लिंबू पिकांकरिता सहभाग नोंदविण्याची अंतिम मुदत १४ जून होती. मात्र, या योजनेत सहभागी होऊ इच्छिणारे शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नये म्हणून केंद्र शासनाने ३० जून पर्यंत मुदतवाढ दिली आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी अ‍ॅग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य असल्याने ज्या शेतकर्‍यांनी अजून पर्यंत ओळखपत्र क्रमांक तयार केला नसेल त्यांनी तातडीने तयार करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे. Fruit Crop Insurance Scheme या योजनेत सहभागी होण्याकरिता बँकेत किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर विहित मुदतीत विमा हप्ता भरून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.