नागपूर,
Hadas Primary and High School मराठी भाषेत लेखन करताना लिखाणाच्या चुका कमी होण्याच्या उद्दिष्टाने व विद्यार्थ्यांना लेखन नियम तसेच प्रमाणित भाषा पुढच्या पिढीला शिकवण्याच्या दृष्टीने हडस प्रायमरी व हायस्कूल रामदास पेठ नागपूर येथे तीन दिवसात माय मराठी शुद्धलेखन कार्यशाळा घेण्यात आली होती. या कार्यशाळेत भाषा प्रमाणित विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले. स्वर व व्यंजने, उच्चारण स्थाने, विरामचिन्हे, जोडाक्षरांचे नियम, वाक्प्रचार व म्हणी, भाषेतील आलंकारिकता इत्यादी विषयांवर प्रकाश टाकण्यात आला. शाळेच्या ज्येष्ठ मराठी शिक्षिका दर्शना यांनी विद्यार्थ्यांना तसेच सहकारी शिक्षकांना प्रशिक्षण दिले. स्वाती फडके यांनी अलंकार शिकविले. शाळेच्या मुख्याध्यापिका मृणाल कासखेडीकर यांनी उपरोक्त कार्यशाळेसाठी मार्गदर्शन केले. तीन दिवसीय कार्यशाळेला वर्ग ८, ९, १० च्या विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. समापनाला नियमानुसार लेखन ही श्रुतलेखन स्पर्धा सुरभी संगमनेरकर यांनी घेतली. परीक्षणाचे काम सुरभी संगमनेरकर, वेदिका पिंपळापुरे, जयश्री बपोरीकर यांनी केले. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे संचालन विदुला नाईक यांनी केले. मुख्याध्यापिका मृणाल कासखेडीकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

वर्ग १० या गटातून प्रथम पारितोषिक चि. अमोघ चिटणवीस यांनी पटकावले तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक चि तनिष भेलावे याला मिळाले. वर्ग ८ व ९ या गटातून प्रथम पारितोषिक नचिकेत बापट याने पटकविले तर द्वितीय पारितोषिक हिमांशू बागडकर व विवेक कुंभारे यांना विभागून देण्यात आले. Hadas Primary and High School कार्यशाळेच्या प्रथम सत्रात मुख्याध्यापिका कासखेडीकर यांनी बोलीभाषा व प्रमाणित भाषा यांच्यातील बोली भाषेचे काही नमुने देखील प्रस्तुत केले. कार्यशाळेत प्रशिक्षण दर्शना यांनी दिले व संपूर्ण कार्यशाळेचे नियोजन व त्या अनुषंगाने घेतलेल्या कार्यक्रमांचे सूत्रसंचलन केले. अश्विनी नासरे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे चित्रण केले.
सौजन्य: गजानन रानडे, संपर्क मित्र