माऊलींच्या पालखीसोबत 2.95 लाख, तर तुकोबांच्या पालखीसोबत 1.95 लाख वारकरी

23 Jun 2025 16:38:40
पुणे,
Pandharpur Wari 2025 आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहू येथील संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या दोन दिवस पुण्यात मुक्कामी होत्या. दोन दिवसांच्या मुक्कामानंतर रविवारी रात्री या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. यंदा पुणे पोलिसांनी वारीतील गर्दी मोजण्यासाठी प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर केला.
 

Pandharpur Wari 2025 
विश्रांतवाडी,Pandharpur Wari 2025  संचेती चौक, गुडलक चौक, भैरवनाथ मंदिर, गाडीतळ आणि दिवे घाट या प्रमुख ठिकाणी एआय कॅमेरे लावण्यात आले होते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने पुण्यात माऊलींच्या पालखीसोबत 2 लाख 95 हजार वारकरी आले असल्याची नोंद झाली आहे. तर तुकोबांच्या पालखीसोबत 1 लाख 95 हजार वारकरी पुणे शहरात दाखल झाले होते. एकूण पाच लाख वारकऱ्यांची उपस्थिती एआय कॅमेर्‍यांद्वारे नोंदवली गेली आहे. प्रयागराज कुंभमेळ्याच्या धर्तीवर पुण्यातही गर्दीचे अचूक मोजमाप करण्यासाठी एआयचा प्रयोग यशस्वी ठरल्याचे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
 
 
दरम्यान, संत तुकाराम महाराजांची पालखी रविवारी रात्री लोणी काळभोर येथे मुक्कामी होती. सोमवारी सकाळी ही पालखी यवतच्या दिशेने मार्गस्थ झाली. लोणी काळभोरमध्ये हवेली तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत केले. संत ज्ञानेश्वर माऊलींची आणि संत तुकाराम महाराजांची पालखी दिवे घाट पार करून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे.
Powered By Sangraha 9.0