लोकप्रितिनिधी, अधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे ‘स्वागत’

23 Jun 2025 19:22:24
यवतमाळ,
Zilla Parishad schools जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे लोकप्रतिनिधी, अधिकाèयांनी स्वागत केले. तर पुसद तालुक्यात राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे चक्क विद्यार्थ्यांसोबत जमिनीवर बसले. मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी विद्यार्थ्यांचे पेढा देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांची पावले म्हणजे लक्ष्मीची पावले समजून ‘कुंकूवाच्या ताटात’ पाय टाकून वर्गात घेऊन गेले.
 
 

Zilla Parishad schools 
घुईच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेत अतिशय उत्साहात शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत समग्र शिक्षाचे धनंजय गव्हाणे उपस्थित होते. शिक्षणधिकारी मिश्रा यांच्या हस्ते वर्ग पहिलीतील नवीन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. शिक्षणाधिकारी अगदी हसत खेळत आनंदमय वातावरणात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच ‘एक पेड मां के नाम’ या उपक्रमांतर्गत शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. नवीन सत्रासाठी सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सरपंच दिलीप चव्हाण, गावातील प्रतिष्ठित नागरिक अनिल बापट, पालकवर्ग, अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होते. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक विनोद शिरभाते, शाळेतील ज्येष्ठ शिक्षक डॉ. सतपाल सोवळे, राहुल टाले, अपराजिता राऊत व प्रांजली तिडके उपस्थित होत्या.तर जिप उच्च प्राथमिक शाळा वालतूर तांबडे केंद्र चोंढी पंचायत समिती पुसद अंतर्गत राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी शाळेला भेट दिली. या भेटीदरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके गणवेश वाटप करण्यात आले. शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.
ही शाळा आठ वर्षांपासून खेळ क्रीडा स्पर्धेत जिल्हास्तरावर चॅम्पियनशिप मिळवलेली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खेळ, खेळांचे सर्व साहित्य व एक डिजिटल रूम देण्याचे त्यांना आश्वासित करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री नाईक हे चक्क विद्यार्थ्यांसोबत खाली बसले होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी यवतमाळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पेढा देऊन स्वागत केले.
 
Powered By Sangraha 9.0