गडचिरोली,
Adv. Ashish Jaiswal आदिवासी व दुर्गम जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्या गडचिरोली जिल्हा येत्या काही वर्षात विकसित जिल्हा म्हणून जगाच्या पटलावर आपला ठसा उमटविणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘विकसित जिल्हा’ हा संकल्प पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न सर्वस्तरावरून सुरू असल्याचे सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी म्हटले.
सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल हे सोमवारी गडचिरोली जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते. दरम्यान, जिल्ह्याच्या विकासावर सर्व विभागाचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते पत्रकारांशी बोलत होत होते. यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना, ना. अॅड. जयस्वाल म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यातील विविध समस्यांचे तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या आहेत. त्या सर्व समस्यांचे निराकरण करून विकसित जिल्हा हा मुख्यमंत्र्यांचा संकल्प पूर्ण करायचा आहे. त्यासाठी आपण सर्वाचा सहकार्य आवश्यक आहे. येथील वन्य प्राणी आणि मानव संघर्ष, शेतकर्यांचा प्रश्न, कुपोषणाचा प्रश्न, कृषी, सिंचनाचा प्रश्न, पूरग्रस्त गावांचे पुनर्वसन, शिक्षण आणि आरोग्य, रोजगार, पाणी पुरवठा निर्मितीसह जिल्ह्यांच्या विकासातील विविध प्रश्नांचा आज आढावा घेण्यात आला. शेतकर्यांच्या मालाला योग्य भाव, विशेष करून येथील महिलांना स्वयंरोजगार, शिवाय जिल्ह्यात रेती माफियानाकडून होत असलेली रेती तस्करी यावरही कठोर पाऊले उचलण्यात येणार आहेत. त्यांना पाठीशी घालणार्या संबंधित अधिकार्यांनाही आपण सोडणार नसल्याचे ते म्हणाले. तसेच सध्या जिल्ह्यात गाजत असलेला बोगस डॉक्टरचा मुद्दा आपण गांभीर्याने घेतला असून त्याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे, होऊ घातलेल्या विमानतळाबद्दल शेतकर्यांच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणून घेतल्या आहेत. शेतकर्यांच्या सुपीक जमिनी जाणार नाही, याचा पुरेपूर विचार करूनच विमानतळ उभारण्यात येणार आहे.Adv. Ashish Jaiswal त्यामुळे शेतर्यांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये, असेही अॅड. जयस्वाल म्हणाले. तसेच आता नवे शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे. शेतकर्यांच्या हंगामालाही सुरुवात झाली आहे. अशातत विद्यार्थी व शेतकर्यांच्या कामात अडथळा आणणार्या अधिकार्यांनाही त्याची जागा दाखविण्यात येईल, असेही सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल म्हणाले. याप्रसंगी संबंधित विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.