जमीन मोजणी आता डिजिटल

-क प्रतही मिळतेय् -तक्रारींचे प्रमाण आले 0.3 टक्क्यांवर -भूमिअभिलेख कार्यालयात चकरा मारणे बंद

    दिनांक :24-Jun-2025
Total Views |
नागपूर, 
Land measurement-Digital : जमीन मोजणी अर्ज ऑनलाईन करण्याबरोबरच मोजणीच्या वेळीस उपस्थित असलेल्यांचे छायाचित्रण करून अपलोड करण्यापर्यंतची सुविधा 'ई-मोजणी व्हर्जन 2.0'मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे मोजणीच्या वेळेस अर्जदाराच्या सोईनुसार क्षेत्रात बदल करणे, मोजणीच्या वेळी उपस्थित राहूनही ती पूर्ण झाल्यानंतर हरकत नोंदविणे यासह अनेक गैरप्रकारांना आळा बसणार आहे. डिजिटल मोजणीमुळे तक्रारींचे प्रमाणही कमी झालेले दिसून येत आहे.
 
 
ngp
 
'ई-मोजणी व्हर्जन 2.0' प्रणालीमुळे जमीन मोजणीत पारदर्शकता आली आहे. सात महिन्यांत राज्यभरात अशा प्रकारे सुमारे तीन लाख मोजण्या झाल्या. यामध्ये तक्रारींचे प्रमाण 0.3 टक्क्यांवर आले आहे. भूमिअभिलेख विभागाकडून जमिनीची हद्द कायम करणे, पोटहिस्सा, बिगरशेती, कोर्टवाटप, कोर्ट कमिशन व विविध प्रकल्पांसाठी भू-संपादनासाठी मोजणीचे काम केले जाते. ई-मोजणी 2.0 प्रणालीमध्ये जमीन मोजणीसाठी अर्ज करावा लागतो. त्यानुसारच मोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. यामध्ये जमीनधारक स्वत:च ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून शुल्कही भरू शकतो. मोजणी अर्जाबाबतची सद्यःस्थिती अर्जदाराला एसएमएसद्वारे कळते. जमिनींची मोजणी 'जीआयएस' आधारित रोव्हर्सद्वारे करण्यात येत आहे. यासह जमीन मोजणीच्या नकाशाची प्रत अर्जदाराच्या लाँगिगमध्ये मिळते. त्यामुळे जमीन मोजणीनंतर अर्जदाराला ङ्गकङ्ख प्रतीसाठी भूमिअभिलेख कार्यालयात चकरा माराव्या लागत नाहीत.
 
मानवी हस्तक्षेपास वाव नाही
 
 
संगणकप्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्याने मोजणीसाठी मानवी हस्तक्षेपास वाव होता. आता तो राहिलेला नाही. कारण, प्रत्येक टप्प्याची माहिती अर्जदाराला मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. प्रत्यक्ष जमीन मोजणीच्या वेळी लगतच्या शेतकèयांसह सर्व्हेअरचेसुद्धा छायाचित्र अपलोड होत आहे. त्यामुळे मोजणीला कोण-कोण उपस्थित होते, त्यांची सहमती आहे का, प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजणी केली आहे का, हे सुद्धा या प्रणालीमध्ये अपलोड होते. तसेच पंचनामाही अपलोड करावा लागतो. 'क' प्रत अर्जदाराच्या लॉगिंगमध्ये उपलब्ध असल्याने कितीही वेळा ती डाऊनलोड करता येते. ङ्गकङ्ख प्रतीवर अक्षांश -रेखांशाचा उल्लेख असतो. त्यामुळे हद्द बदलत नसून, तक्रारींचे प्रमाण घटल्याचे भूमिअभिलेख विभागाने सांगितले.
 
तक्रारींचे प्रमाण झाले कमी
 
 
पूर्वी मोजणीच्या वेळी तक्रारींचे प्रमाण 5 ते 10 टक्के होते. आता ते 0.3 टक्के इतके नगण्य आहे. यापूर्वी मोजणीची नोटीस मिळाली नाही, मोजणीच्या वेळी उपस्थित असूनही खोटे सांगणे, हद्द-खुणा दाखविल्यानंतर त्या मान्य नसणे अथवा पहिल्यांदा मान्य करून नंतर मोजणी मान्य नसल्याचा अर्ज देण्याचे प्रकार घडत असत. त्यामुळे मोजणीनंतर तक्रारींचे प्रमाण जास्त होते. आता सर्वच प्रक्रिया ऑनलाईन असल्याने मानवी हस्तक्षेप टळणार आहे.
ई-मोजणीमुळे फायदे
 
 
- ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा
-अर्ज दाखल केल्यानंतर स्पीड पोस्टने नोटिशी पाठविल्या जातात
-मोजणीचा पंचनामा ऑनलाईन अपलोड
- उपस्थितांचे फोटो अपलोड करण्याची सुविधा
- अक्षांश-रेखांक्षासह मोजणी
- हद्दी-खुणांमध्ये बदल करण्यास वाव नाही
- मोजणीनंतर तक्रार करणे अवघड
-ङ्घकङ्ख प्रतदेखील ऑनलाईन उपलब्ध