सरस्वती विद्यालय येथे प्रवेशोत्सव धडाक्यात साजरा

    दिनांक :24-Jun-2025
Total Views |
नागपूर,
Saraswati Vidyalaya High School शाळेच्या पहिल्या दिवशी सरस्वती विद्यालय हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत झाले. प्रवेशद्वारावर पुष्प वर्षाव झाला आणि सर्वत्र उत्साहाचे व जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांनी स्कूल चले हम नृत्य सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
 
 

शाळा  
 
 
संगीत शिक्षिका रूपाली बक्षी आणि सर्व विद्यार्थ्यांनी राज्यगीताचे गायन केले.Saraswati Vidyalaya High School सरस्वती विघालयाच्या मुख्याध्यापिका पुष्पा अनंतनारायण यांनी स्वागतपर भाषण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपमुख्याध्यापिका लक्ष्मी श्रीनिवासन् तसेच पर्यवेक्षक रवींद्र कुळकर्णी आणि राहुल घोडे उपस्थित होते. सुत्रसंचालन रोहिणी महल्ले यांनी केले. शेवटी विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आले.
सौजन्य :अनिल देव,संपर्क मित्र