तभा वृत्तसेवा राळेगाव,
Dahegaon बैलांना पाणी पाजण्यासाठी नाल्यात गेलेल्या एका शेतकèयाचा बैलबंडीसह पाण्यात बुडून अंत झाला. या घटनेत बैलजोडी सुखरूप वाचली असून बंडीला मागे बांधलेल्या एका गोèह्याचा मात्र पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथे बुधवार, 25 जून रोजी दुपारी 1 च्या दरम्यान घडली. राजू कृष्णाजी रोकडे (वय 50) असे पाण्यात बुडून अंत झालेल्या शेतकèयाचे नाव आहे.
शेतकरी राजू रोकडे हे घरून आपली बैलबंडी घेऊन शेताकडे निघाले होते. दरम्यान दहेगावला लागूनच असलेल्या नाल्यावर बैलांना पाणी पाजण्याकरिता बैलबंडी घेऊन नाल्यात उतरले असता राजू रोकडे याचा तोल गेल्याने ते बैलबंडीसह पाण्यात पडले. यात त्यांचा पाण्यात बुडून अंत झाला.
या घटनेत दोन्ही बैल सुखरूप वाचले असून एका गोèह्याचा मात्र पाण्यात पडून मृत्यू झाला. हा प्रकार गावातील नागरिक व तरुणांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत राजू रोकडे यास पाण्यातून बाहेर काढून त्यांना उपचारासाठी करंजी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण त्यांना मृत घोषित करण्यात आले.
घटनास्थळी वडकी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील कुडमेथे व धनराज शेगेकर यांनी भेट दिली व घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास वडकी पोलिस करीत आहे.यावेळी राजू रोकडे यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. कै. रोकडे यांच्यामागे पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. या घटनेबाबत परिसरात हळहळ आहे.