पंढरपूर सायकलवारीचे रामनगरीत स्वागत

६ दिवसात पार केला साडेसातशे किलोमिटरचा सायकल प्रवास

    दिनांक :25-Jun-2025
Total Views |
रामटेक, 
Pandharpur Wari रामटेक येथील सहा सायकलस्वार आषाढी निमित्त पंढरपूर वारीसाठी निघाले होते. त्यात सुष्टी सौंदर्य परिवारचे ऋषीकेश किंमतकर, डॉ रामचंद्र जोशी, तेरा वर्षीय अभंग किंमतकर, लक्ष्मीकांत तिबुडे , सारंग पंडे, राजेश बाकडे होता.निघतेवेळी त्यांना राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी भगवी झेंडी दाखविली व सायकलस्वारांचा प्रवास सुरू झाला.त्यांनी सहा दिवसात साडेसातशे किलोमिटरचा प्रवास करून पंढरपुर गाठले. सायकलवारीचे आयोजन टायगर ग्रुप आँफ ॲडव्हेंचर नागपूर , क्रिडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर ते पंढरपूर सायकलस्वारीचे आयोजन करण्यात आले होते.
 

saykal  
 
 
 
सोमवार २३ जूनला ते रामटेक येथे परत आले. Pandharpur Wari दरम्यान शहरातील गांधी चौक येथे या सायकलस्वारांचे माजी नगरसेवक राजेश किंमतकर, सुमीत कोठारी ,राम डेव्हलपर्स चे गजु बिसने, बिकेंद्र महाजन, चुन्नीलाल चौरसिया, समर्थ हायस्कूल च्या प्राचार्य ममता लोखंडे, पत्रकार अनिल वाघमारे, राजु कापसे अमोल खडोतकर, डॉ. सेलोकर, नामदेव राठोड, वेदप्रकाश मोकरदम, रवि मथुरे, अमोल गाढवे, उमेश हटवार, महाजन, दत्तात्रय पंडे यांचेसह रामटेक वासीयांनी जल्लोषात स्वागत करीत कौतुक केले.
सौजन्य:सारंग पांडे,संपर्क मित्र