'बाबुराव गणपतराव आपटेच' हवे

हेरा फेरी ३" चित्रपट वाद

    दिनांक :25-Jun-2025
Total Views |
मुंबई,
Hera Pheri 3 अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या आगामी 'निकिता रॉय' चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, अभिनेत्रीने परेश रावल यांच्या बहुप्रतिक्षित 'हेरा फेरी ३' चित्रपटातून बाहेर पडण्याबद्दल बोलली आहे. सोनाक्षीचा असा विश्वास आहे की अभिनेता परेश रावलशिवाय हा आगामी चित्रपट मजेदार नाही. ती 'बाबुराव गणपतराव आपटे' शिवाय चित्रपटाचा विचारही करू शकत नाही.
 
 

Sonakshi Sinha on Hera Pheri 3 
ही भूमिका साकारून परेश रावल यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. परेश रावलशिवाय हा विनोदी चित्रपट अपूर्ण आहे, 'परेश रावलशिवाय मी 'हेरा फेरी ३' ची कल्पनाही करू शकत नाही. त्यांची उपस्थिती या चित्रपटाचा जीव आहे.'असे मत सोनाक्षीने दर्शविले
 
 
सोशल मीडिया पोस्टद्वारे खुलासा
 
 
अलिकडेच Hera Pheri 3 परेश रावल यांनी सोशल मीडियावर घोषणा केली होती की ते 'हेरा फेरी ३' चा भाग राहणार नाहीत. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी सांगितले होते की 'हेरा फेरी ३' सोडण्याचा त्यांचा निर्णय सर्जनशील मतभेदांमुळे नव्हता. दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्याशीही त्यांचे कोणतेही मतभेद नाहीत.सोनाक्षीने 'निकिता रॉय' या चित्रपटात परेश रावल यांच्यासोबत काम केले होते. सोनाक्षी सिन्हानेही तिच्या 'निकिता रॉय' या चित्रपटात पहिल्यांदाच परेश रावल यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. ती म्हणाली- 'परेश रावलसारख्या प्रतिभावान अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट होती. त्यांचे काम आणि त्यांच्या अभिनयाची खोली मला खूप प्रभावित करते.' परेश रावल प्रत्येक भूमिकेत अद्भुत आहे, मग ती विनोदी भूमिका असो किंवा गंभीर. असे सुद्धा तिने सांगितले.'सोनाक्षीच्या 'निकिता रॉय' या नवीन चित्रपटात ती परेश रावल, अर्जुन रामपाल आणि सुहेल नायर यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे तिचा भाऊ कुश सिन्हा दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे. हा चित्रपट २७ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.