समुद्रपूर देशातील पहिला गर्भाशय कर्करोगमुत तालुका होईल: खा. काळे

25 Jun 2025 20:01:49
वर्धा,
Samudrapur महिलांमध्ये गर्भाशयमुख कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्याला या कर्करोगापासून मुत करण्यासाठी सामाजिक संस्थेच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावर काम करणे आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यात समुद्रपूर तालुयापासून आपण या मोहिमेला सुरुवात करतो आहे. तालुयातील प्रत्येक महिलेस विनामूल्य लस देऊन हा तालुका देशातील पहिला गर्भाशयमुख कर्करोगापासून मुत तालुका करू, असा विश्वास खा. अमर काळे यांनी व्यत केला.
 
 
Samudrapur
 
आरोग्य विभाग, स्वास्थ्य वृक्ष फाऊंडेशन व मॅनकाईंड फार्माच्या संयुत सहकार्याने खा. अमर काळे यांच्या पुढाकारातून ही विशेष लसिकरण मोहिम राबविण्यात येत आहे. आज २५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी., शरद पवार गटाचे प्रदेश सचिव अतुल वांदिले, जिपचे माजी उपाध्यक्ष सुनील राऊत, स्वास्थ्य वृक्ष फाऊंडेशनच्या अध्यक्ष डॉ. दीपिका चांढोक, उपाध्यक्ष अभिषेक चावला, आदी उपस्थित होते.
 
  
गर्भाशयमुख कर्करोगाची लस महागडी आहे तसेच या कर्करोगाबाबत जनजागृतीचा अभाव आहे. समुद्रपूर तालुयातील प्रत्येक गावातील साधारणपणे ९ ते २६ वयोगटातील १३ हजार मुली, महिलांना विनामुल्य लस देण्यात येणार आहे. त्यासाठी ३ हजार ३०० लसी मॅनकाईंड फार्मा कंपनीकडून त्यांच्या सामाजिक दायित्वातून उपलब्ध झाल्या आहेत. उर्वरीत ९ हजार लसी देखील तालुयासाठी उपलब्ध करुन देऊ. या लसिकरण मोहिमेसाठी आरोग्य विभागासह ग‘ामस्तरावरील गट प्रवर्तक, अंगणवाडी सेविका, आशा यांचे योगदान लागणार असल्याचे खा. काळे म्हणाले.
 
 
समुद्रपूर तालुयातील कवठा येथुन लसिकरणास सुरुवात होईल. तीन वर्षात लसिकरणाचे सर्व टप्पे पार होऊन तालुका देशातील पहिला गर्भाशयमुख कर्करोगमुत तालुका होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण जिल्ह्यात मोफत लसिकरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी गर्भाशय मुख कर्करोगाची जनजागृती होणे आवश्यक आहे. समुद्रपूर तालुयातील व पुढे जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुली, महिलांनी लसिकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
 
 
दीपिका चांढोक व उपाध्यक्ष अभिषेक चावला यांनी फाऊंडेशनच्या कॅन्सर कवच या मोहिमेची माहिती दिली. फाऊंडेशनच्या वतीने विदर्भातील २५ हजार मुलींना विनामुल्य लस देण्यात आली आहे. खा. अमर काळे यांचा पुढाकार आणि सहकार्यामुळे समुद्रपूरसह संपूर्ण जिल्ह्यात लसिकरण मोहिम उत्तमपणे राबवून जिल्ह्याला गर्भाशयमुख कर्करोगमुक्त करू असे सांगितले.
Powered By Sangraha 9.0