नागपूर,
All India Radio Nagpur आकाशवाणी नागपूर आपल्या दैनंदिन कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहचण्याचा प्रयत्न करीत आहे. डिजिटल युगाच्या माध्यमात आजही आकाशवाणीने आपले स्थान टिकवून ठेवले आहे. आता newsOnair अँपच्या माध्यमातून जगभर आकशवाणी पोचली असल्याचे प्रतिपादन आकाशवाणी नागपूर केंद्राचे उप महानिदेशक (अभियांत्रिकी) रमेश घरडे यांनी केले.आकाशवाणी नागपूरच्या कृषी आणि गृह बिभाग तर्फे ग्रामीण कार्यक्रम सल्लागार समितीची त्रैमासिक सत्र जुलै ऑगस्ट सप्टेंबर २०२५ ची बैठक काल आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सभागृहात संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीच्या सुरुवातीला सध्या सुरु असलेल्या तिमाहीतील महत्वाच्या कार्यक्रमाचा आढावा तसेच जुलै ऑगस्ट सप्टेंबर 2025 या त्रैमासिकात प्रसारित होणारे कृषि आणि गृह विभागाच्या कार्यक्रमाचे पूर्वावलोकन कृषि कार्यक्रम अधिकारी सचिन लाडोले यांनी केले. या तिमाहील प्रसारित होणारे कार्यक्रमाचे वाचन नैमीतिक उद्घोषक श्यामली राऊत, निहास लोखंडे,शंतनू ठेंगडी आणि रोहिणी सूर्यवंशी यांनी केले.

आकाशवाणी कृषि विभागाचे कार्यक्रम अधिकाधिक लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने निरंतर प्रयत्न करीत असल्याचे आकाशवाणी कार्यक्रम प्रमुख प्रियदर्शनी राऊत,नागपूर यांनी सांगितले. All India Radio Nagpur या बैठकीला गजानन खडसे, मुख्य वैज्ञानिक निरी, अश्विनी नीलकंठ टेकाम, मत्स्य व्यवसाय अधिकारी, राकेश जोशी, रेशीम संचालनालय नागपुर,आदेश एस. वाघमारे, रेशीम संचालनालय नागपुर, उषा आर. डोंगरवार, वरिष्ठ वैज्ञानिक एवं प्रमुख के.व्ही. के. कृषी विज्ञान केंद्र साकोली, राजेश एम् मेश्राम, प्रसिद्धी शाखा वन विभाग वन भवन नागपूर, डॉ. दत्तात्रय येले, कृषी उपसंचालक जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नागपूर , अश्विनी टेकाम, मत्स्य व्यवसाय अधिकारी, अजिंक्य घाटेकर, विभागीय व्यवस्थापक, एफ डी सी एम भवन नागपूर, डॉ. उल्हास गळकाटे एस.एम.एस.के.वी.के.,आई.सी.ए.आर, सी.आई.सी.आर. नागपूर निलय भोगे, विभागीय वन अधिकारी वन भवन सिव्हिल लाइन्स नागपूर,सागर कांबले, वन अधिकारी, डी एस ए ओ नागपुर, डॉ. हर्षा मेंढे कृषी महाविद्यालय नागपूर यांची उपस्थिती होती.
सौजन्य:डॉ रवींद्र भुसारी, संपर्क मित्र