मेघे अभिमत विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार

ब्रिटन, इंडोनेशिया, अमेरिकेतील विद्यापीठे व एसेम एलएलएल हबचा सहभाग

    दिनांक :26-Jun-2025
Total Views |
वर्धा,
Datta Meghe Institute of Higher Education and Research Abhimat University सावंगी येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाद्वारे आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चार महत्त्वपूर्ण संस्थांसोबत दीर्घकालीन शिक्षण व संशोधनाच्या आजीवन दृढतेसाठी सामंजस्य करार करण्यात आला. यात युनायटेड किंगडममधील सुमारे शंभर वर्षांची शैक्षणिक परंपरा असलेली हल युनिव्हर्सिटी, इंडोनेशियातील एसा उंगुल युनिव्हर्सिटी, अमेरिकेतील वेस्टर्न मिशिगन युनिव्हर्सिटी आणि आशिया युरोप मीटिंग एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च हब या अधिकृत विद्यापीठांचा व संस्थेचा समावेश आहे.
 

Datta Meghe Institute of Higher Education and Research Abhimat University ,wardha  
दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे, मुख्य सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा व प्रधान सल्लागार सागर मेघे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक कार्यकारी संचालक डॉ. संदीप श्रीवास्तव, उपसंचालक डॉ. आदित्य केकतपुरे, डॉ. रोमा मोरघडे, भुवनेश्वरी एम. आणि कार्यकारी सहाय्यक निहारिका मुंजेवार यांनी हा सामंजस्य करार पूर्णत्वाला नेला. या धोरणात्मक सामंजस्य कराराद्वारे शिक्षणावरील तुलनात्मक संशोधनात निपुणता आणि संशोधनावर आधारित शिक्षण धोरण राबविणे, परस्परात अभ्यासक्रम विकसित करणे, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आदानप्रदान सुलभ करणे, आयुर्विज्ञान, तंत्रज्ञान आणि समाजविज्ञान यासारख्या क्षेत्रात संयुक्तरित्या संशोधनकार्य करणे आणि आजीवन शिक्षणाला प्रोत्साहन देणारी जागतिक चर्चासत्रे व कार्यशाळा आयोजित करणे, या उद्दिष्टांना प्राधान्य देत मेघे अ