सरन्यायाधीश भूषण गवई नागपूर दौऱ्यावर

    दिनांक :27-Jun-2025
Total Views |
नागपूर,
Bhushan Gavai देशाचे सरन्यायाधीश न्या. भूषण गवई उद्या, 27 जून रोजी नागपूर येथे येत आहेत. शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता सिव्हिल लाईन्स येथील जिल्हा न्यायालय परिसरात डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन तर्फे आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील.
 
 

Bhushan Gavai  
शनिवार 28 जून रोजी सकाळी 11 वाजता रवी नगर येथील विधी महाविद्यालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते संविधान उद्देशिका पार्क आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. दुपारी 4.30 वाजता त्यांच्या हस्ते उच्च न्यायालय येथील दुसऱ्या माळ्यावरील बार रूमचे उद्घाटन करण्यात येईल. सायंकाळी 6.30 वाजता रेशीम बाग येथील सुरेश भट सभागृहात सरन्यायाधीश भूषण गवई यांचा हायकोर्ट बार असोसिएशन तर्फे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. रविवार, 29 जून रोजी सकाळी 10.30 वाजता वारंगा बुटीबोरी येथील महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी येथे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.