पंजाब,
Ludhiana drum murder case उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये काही महिन्यांपूर्वी घडलेल्या सौरभ राजपूत हत्या प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडवली होती. या प्रकरणात निळ्या ड्रममध्ये मृतदेह सापडला होता. आता असाच एक थरारक प्रकार पंजाबच्या लुधियाना येथे समोर आला असून, पुन्हा एकदा 'निळा ड्रम' चर्चेचा केंद्रबिंदू ठरतो आहे.
लुधियानातील Ludhiana drum murder case एका भागात दुर्गंधीमुळे हैराण झालेल्या स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होताच निळ्या रंगाच्या ड्रममध्ये कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला. या ड्रममध्ये मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून ठेवलेला होता. विशेष म्हणजे मृत व्यक्तीच्या पायांना आणि मानेला दोरीने बांधण्यात आले होते. त्यामुळे ही हत्या पूर्वनियोजित असल्याचा संशय अधिकच बळावतो आहे.
पोलीस तपासाची माहिती
घटनास्थळी Ludhiana drum murder case दाखल झालेल्या स्थानिक पोलीस ठाण्याच्या प्रमुख कुलवंत कौर यांनी माहिती देताना सांगितले की, "मृतदेह पूर्णतः कुजलेला आहे. तो प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवण्यात आला होता. शरीरावर कोणतीही जखम स्पष्टपणे दिसत नाही. त्यामुळे मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे." सध्या मृतदेह जवळच्या सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.प्राथमिक तपासात असे आढळले की मृत व्यक्ती स्थलांतरित मजूर असण्याची शक्यता आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित मजूर राहत असल्याने त्यांच्या स्तरावर चौकशी सुरू करण्यात आली आहे.
ड्रम उत्पादकांवर संशयाची सुई
पोलिसांनी Ludhiana drum murder case ड्रमबाबत सखोल चौकशी सुरू केली आहे. ज्या ड्रममध्ये मृतदेह सापडला तो नवीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तो खास हत्येसाठी विकत घेतल्याचा संशय आहे. यामुळे लुधियानामधील ४२ ड्रम उत्पादकांची यादी तयार करून चौकशी सुरू करण्यात आली आहे.मृतदेह सापडलेल्या ठिकाणाहून ५ किलोमीटरच्या परिघातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. याशिवाय रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि परिसरातील इतर महत्त्वाच्या ठिकाणांवरील फुटेजही तपासण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळाजवळून गेलेल्या संशयित वाहनांचीही यादी तयार करून तपास सुरू केला आहे.