त.भा.इम्पैक्ट
सिंदीरेल्वे,
Eagle Infra.Company केळकर ते दहेगाव(गो) दरम्यानच्या नऊ कि.मी.मार्गाची गत चार महिन्यांत चाळण झाली.ग्रामस्थांच्या समस्यांची दखल घेत आम.कुणावार यांनी काल प्रशासकीय यंत्रणेशी बातचित करुन सदर मार्गाची दैन्यावस्था संपुष्टात आणा! त्वरित कामाला लागा असे निर्देश दिलेत.त्यामुळे आता मार्गाचा कायापालट होण्याची शक्यता बळावली आहे.
दोन महिन्यांपूर्वी या प्रकरणी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दै.तरुण भारताने विस्तृत बातमी प्रकाशित केली होती, हे वाचकांच्या स्मरणात असेलच ! काल वर्धा येथे जिल्हा नियोजन आणि विकास समितीची बैठक पार पडली.त्यावेळी दहेगाव आणि आजूबाजूच्या दोन डझन नागरिकांनी आमदार कुणावार यांची भेट घेत पुन्हा मागण्याचा पाढा वाचला.
परिणामी, आमदारांनी तातडीने संबंधित एजन्सीच्या अधिकाऱ्यांना बोलावून जनतेच्या मागण्यांबाबत समजावून सांगितले.सदर मार्गाची पाहणी करून त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.तक्रारदार नागरिकांना देखील मी दिलेला शब्द पाळणारा व्यक्ती आहोत.त्यामुळे थोडे सबुरीने घ्या,काम होईल याबद्दल खात्री बाळगा,अशी विनंती केली. वर्धा मुक्कामी जाऊन समस्यांचे निवेदन देताना विदर्भ राज्य संघटनेचे राजकिशोर शिंगणधुपे,प्रणय शेंद्रे,संजय पिसुड्डे,अमोल पिटाळले,मंगेश तिजारे,अनिल चव्हाण,तुकाराम महाबुधे,रेखा महाबुधे, हेमलता महाबुधे, कवडू राऊत,बबन लाऊडधरे आदींची उपस्थिती होती.