खा. काळेंपुढेच काकडे यांना मारहाण

    दिनांक :27-Jun-2025
Total Views |
वर्धा,
Wardha beating news गेल्या अनेक वर्षांपासून सर्व सेवा संघाच्या चर्मालयाच्या या जागेचा वाद सुरू आहे. प्रकरण पोलिस स्टेशनमध्ये पोहोचलेले असताना शासकीय विश्रामगृहात वाढई यांच्या पत्नीने किसान अधिकार अभियानाचे प्रेरक व गांधीवादी अविनाश काकडे यांना स्थानिक शासकीय विश्राम गृहात आज २७ रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास खासदार अमर काळे यांच्या पुढेच मारल्याचे राधाकृष्ण बजाज गोशाळेचे संचालक सचिन वाढई यांनी तरुण भारत सोबत बोलताना सांगितले.
 
 
Wardha news
 
गोपुरी येथील सर्व सेवा संघाच्या परिसरातील चर्मालयातील जागेचा वाद गेल्या अनेक वर्षांपासुन सुरू आहे. येथील काही जागेवर अजानी नामक व्यतीने अनधिकृत ताबा मिळवला असल्याने प्रकरण न्यायालयात गेले आहे. पोलिस स्टेशनमध्ये अनेक तक्रारीही दाखल आहेत. Wardha beating news आज दुपारी या वादावर तोडगा काढण्यासाठी अविनाश काकडे अजानी नामक व्यतीला घेऊन खा. अमर काळे यांना भेटण्यासाठी विश्रामगृह येथे गेले असल्याची माहिती आपल्याला मिळताच आपण स्वत: पत्नीसह विश्रामगृह येथे गेलो. त्या ठिकाणी काकडे यांनी अजानी यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला असता आपल्या पत्नीने काकडे यांना मारल्याचे वाढई यांनी सांगितले. १० दिवसांपूर्वी या प्रकरणात आपल्याला मारण्यासाठी गुंड पाठवण्यात आले होते. त्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दिली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली असुन अजानी व दोन महिला फरार असल्याचे सचिन वाढई यांनी सांगितले. या प्रकरणी अविनाश काकडे