संविधानामुळेच मी सर्वाेच्च पदावर

28 Jun 2025 12:28:08
नागपूर,
Chief Justice Bhushan Gavai देशात राज्यघटना सर्वाेच्च पदावर असून आपण आपल्यालाच अर्पण केलेल्या राज्यघटनेवर देशाचे भवितव्य आहे. भारतीय संविधानामुळेच मी देशाच्या सर्वाेच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावर पाेहचू शकलाे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन न्यायदानात याेगदान दिले. जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वाेच्च न्यायालयातही डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्राचे अनावरण करण्याचा मला मान मिळाणे हे माझे भाग्य समजताे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले. ते जिल्हा वकिल संघटनेच्यावतीने आयाेजित सत्कार कार्यक्रमात बाेलत हाेते. यावेळी मंचावर त्यांच्या आई कमल गवई, पत्नी डाॅ. तेजस्विनी गवई उपस्थित हाेत्या. तसेच व्यासपीठावर न्या. नितीन सांबरे, न्या. प्रसन्ना वराडे, न्या. अतूल चांदूरकर, न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. अनिल किलाेर यांच्यासह अन्य न्यायमूर्ती उपस्थित हाेते.
 
 

Chief Justice Bhushan Gavai Nagpur Bar Association event 
जिल्हा वकिल संघटनेच्यावतीलने सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार कार्यक्रम आयाेजित करण्यात आला. कार्यक्रमाचे नियाेजन संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. राेशन बागडे आणि अ‍ॅड. मनिष रणदीवे यांनी केले. सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले तर ई-लायब्ररीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. राेशन बागडे यांनी भाषणात न्या. गवई यांना उद्देशून जुन्या उच्च न्यायालयाची जागा अन्य न्यायालयासाठी इमारतीकरीत देण्याची मागणी केली तसेच ऑनलाईन आणि ऑफलाईन ायलिंगची मूभा मागितली. न्या. गवई यांनी आपल्या भाषणात दाेन्ही मुद्द्यांवर सकारात्मक विचार करल्याचा प्रतिसाद दिला. यावेळी त्यांनी जिल्हा व उच्च न्यायालयातील अनेक आठवणींना उजाळा दिला.बालपणापासूनच वडिलांची समाजसेवा आणि गाेरगरीबांच्या हितासाठी लढताना बघितले आहे. त्यामुळे गाेरगरीबांवर अन्याय हाेऊ नये म्हणून वकिली करताना नेहमी झटलाे. झाेपडपट्टी हटविण्याचे आदेश असताना गरीबांच्या बाजुने लढून झाेपडपट्ट्या वाचविल्या. तसेच सरन्यायाधीश झाल्यानंतर अनेक वर्षांपासूनचा झुडपी जंगलाचा प्रश्न निकाली लावला, असेही यावेळी गवई म्हणाले.
 
 
सरन्यायाधीश झाले भावूक
 
 
समाजसेवा आणि राजकारणात स्वतःला वाहून घेतलेल्या वडिलांना वकिल व्हायचे हाेते. मात्र, त्यांना एलएलबीची परीक्षा देता आली नाही. परंतु, मुलाला वकील बनवून स्वतःची इच्छा पूर्ण करायची हाेती. मला अजिबात वकील व्हायचे नव्हते. मात्र, वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वकील बनलाे. सर्वाेच्च न्यायालयात वकिली करण्याचे ठरवले असताना वडिलांनी पुन्हा न्यायदानासाठी सज्ज राहण्याचा आदेश दिली. वडिलांच्या दाेन्ही इच्छा पूर्ण केल्या, पण दुर्दैवाने हे यश बघायला माझे वडिल नाहीत, अशी खंत व्यक्त करीत ते भावून झाले. व्यासपीठावर बसलेल्या त्यांच्या आई कमलताई गवई यांचेही डाेळे पानावले.
 
 

जिल्हा वकिल संघटनेचे माेठे याेगदान
 
देशाच्या न्यायदान प्रक्रियेत नागपूर जिल्हा संघटनेचे माेठे याेगदान आहेत. जिल्हा वकिल संघटनेचे न्या.शरद बाेबडे, अ‍ॅड. व्ही.आर. मनाेहर यासारखे माेठे विद्वान येथून निर्माण झाले असून त्यांचे याेगदान अमूल्य आहे. मीसुद्धा बारचा सदस्य हाेताे आणि अनेक केसेसमध्ये येथे येत हाेताे. जाती-पातीच्या पुढचा विचार करणारी ही संघटना असून येथे माझा सत्कार हाेत असल्यामुळे मला अत्यानंद हाेत आहे. उच्च न्यायालय वकील संघटनेचा सत्कार कार्यक्रम झाल्यानंतर मी यापुढे कुठेही सत्कार स्विकारणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेमामालिनीची लढली केस
तत्कालिन प्रसिद्ध सीने अभिनेत्री हेमामालिनी यांच्या कलम 138 (धनादेशाचा अनादर) प्रकरणात मी आणि बाेबडे साहेब आम्ही वकिल हाेताे. त्यावेळी हेमामालिनी हिला बघायला न्यायालयात माेठी गर्दी उसळली हाेती. यावेळी एका सरकारी वकिलाने गरज नसतानाही सरकारकडून बाजू मांडण्यासाठी पुढाकार घेतला हाेता. दुसèया दिवशी पेपरमधील प्रत्येक बातम्यांमध्ये सरकारकडून त्या वकिलाने बाजू मांडली, असे छापून आले हाेते, एवढे बाेलताच सत्कार कार्यक्रमात एकच हशा पिकला.
Powered By Sangraha 9.0