Video अन् झाडावर चढली अस्वल

28 Jun 2025 12:23:39
गोंदिया,
bear climbed the tree जिल्ह्यातील गोरेगाव येथील गोंदिया-कोहमारा महामार्गावरील जानाटोला येथील एका शेतशिवारात एका झाडावर अस्वल चढल्याची घटना आज, २८ जून रोजी सकाळी उघडकीस आली. महामार्गावरून जाणाऱ्या काही नागरिकांना ही अस्वल दिसल्यानंतर नागरीकांनी अस्वलीला पाहण्यासाठी एकच गर्दी केली.
 
 

bear  
 
 
गोरेगाव तालुका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर जानाटोला शेत शिवार असून ही जागा महामार्गाच्या अगदी शेजारी असल्याने महामार्गावरून ये-जा करणाऱ्यांना आज, सकाळच्या सुमारास एका झाडावर अस्वल चढून असल्याचे दिसून आले. दरम्यान, त्या अस्वलीला पाहण्यासाठी अनेकांनी आपली वाहने रस्त्याच्या कडेवर उभी करून सदर झाडाकडे धाव घेतली. याची माहिती शेजारील गावातील नागरिकांना होताच अस्वल पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावांतून नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.bear climbed the tree घटनेची माहिती गोरेगाव वनविभागाला देण्यात आली. माहिती होताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठले असून अस्वलीला रेस्क्यू करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0