स्माेक शाॅपीच्या आड अवैध हुक्का पार्लरवर धाड

28 Jun 2025 14:54:10
नागपूर,
Raid on illegal hookah parlor स्माेक शाॅपीच्या आड सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर हुडकेश्वर पाेलिसांनी गुरूवारी मध्यरात्री धाड टाकून 32 हजार 080 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पाेलिसांनी हुक्का पार्लर चालकांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
 

Raid on illegal hookah parlor 
 

 
हुडकेश्वर पाेलिसांचे Raid on illegal hookah parlor  तपास पथक 26 जून राेजी रात्री 10.40 वाजताच्या सुमारास हद्दीत गस्त घालत असताना त्यांनी मिळालेल्या माहितीवरून बेसा- पिपळा राेडवरील टेक्सास स्माेक शाॅपी येथे धाड टाकली. या ठिकाणी आराेपी शाॅपी मालक सनन विजय शाहू (19, रा. प्लाॅट नं. 9, बेसा-पिपळा राेड, नागपूर) हा स्वत:च्या आर्थिक फायद्याकरीता ग्राहकांना शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखुजन्य हुक्का पदार्थ सेवनाकरीता पुरविताना आढळला. पाेलिसांनी त्याच्याजवळून हुक्का पार्लरकरिता उपयाेगात येणारे साहित्य हुक्का पाॅट, वेगवेगळे फफ्लेव्हरचे तंबाखू व ईतर साहित्य असा एकूण 32 हजार 080 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आराेपीविरूध्द हुडकेश्वर पाेलिसांनी कलम 5, 7, 20 सिगारेट आणि ईतर तंबाखु उत्पादने अधिनियम 2003 अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कामगिरी पाेलिस उपायुक्त रश्मीता राव, सहायक पाेलिस आयुक्त (अजनी विभाग) नरेंद्र हिवरे आणि ठाणेदार ज्ञानेश्वर भेदाेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हुडकेश्वर पाेलिसांनी पार पाडली.
Powered By Sangraha 9.0