पुणे,
DCP Transfer राज्यातील पोलीस यंत्रणेत मोठे प्रशासनिक बदल करत गृह विभागाने शुक्रवारी रात्री ५२ पोलीस उपायुक्त दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. या बदल्यांमुळे पुणे, पिंपरी-चिंचवडसह अनेक ठिकाणी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे.
फोटो इंटरनेटवरून साभार
पुणे शहर DCP Transfer पोलीस दलातील वाहतूक शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांची बदली दौंड येथील राज्य राखीव पोलीस बलात करण्यात आली आहे. तसेच, परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांची बदली खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात करण्यात आली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील उपायुक्त स्वप्ना गोरे यांची नियुक्ती राज्य राखीव पोलीस बलाच्या गट क्रमांक दोनमध्ये करण्यात आली आहे.दरम्यान, पुणे शहर पोलीस दलात नवीन अधिकाऱ्यांचीही भरती झाली आहे. छत्रपती संभाजीनगर परिमंडळ एकचे उपायुक्त सोमय मुंडे, सिंधुदुर्गचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषीकेश रावले आणि दौंड येथील राज्य राखीव पोलीस दलातील अधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांची पुणे शहरात उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच, शस्त्र निरीक्षण शाखेच्या अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांची बदली राज्य राखीव पोलीस दल (गट क्रमांक १) मध्ये अधीक्षकपदी करण्यात आली आहे.राज्यभरातील पोलीस व्यवस्थेतील या बदल्यांमुळे विविध जिल्ह्यांतील पोलीस दलाचे कार्यपद्धतीत लवकरच बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.