अंग प्रदर्शन करणारे कपडे घालणाऱ्या भाविकांना ‘नो एन्ट्री’

29 Jun 2025 13:29:55
लोनावळा,
Ekvira Devi लोनावळा येथील प्रसिद्ध आई एकविरा देवी मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड बंधनकारक करण्यात आला आहे. ठाकरे कुटुंबाचे कुलदैवत असलेल्या आणि कोळी समाजाच्या श्रद्धास्थानी असलेल्या या मंदिरात भाविकांनी पारंपरिक वेशभूषेतच दर्शनासाठी यावे, असे स्पष्ट निर्देश संस्थानकडून देण्यात आले आहेत. ७ जुलै २०२५ पासून या नियमांची अंमलबजावणी होणार असून, मंदिराच्या पावित्र्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
 

Ekvira Devi 
आई एकविरा देवी संस्थानने यासंदर्भात एक अधिकृत पत्रक जारी केले असून, त्यात मंदिरात येणाऱ्या कोणत्याही भक्ताने तोकडे अथवा अंगप्रदर्शन करणारे कपडे परिधान केल्यास त्यांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या नियमाचा अवलंब केवळ भाविकांवरच नव्हे तर स्थानिक दुकानदार आणि रहिवाशांवरही होणार आहे.
 
 
महिलांनी Ekvira Devi  मंदिरात प्रवेश करताना साडी, सलवार-कुर्ता, चूडीदार अथवा इतर पारंपरिक भारतीय पोशाख परिधान करावा लागेल. त्यांच्या वेशात कोणतेही अंगप्रदर्शन होऊ नये, याची काळजी घ्यावी लागणार आहे. पुरुषांनी धोतर-कुर्ता, पायजमा-कुर्ता, पॅन्ट-शर्ट, टी-शर्ट यांसारख्या सुशोभित आणि अंग झाकणाऱ्या पोशाखात यावे. तरुण-तरुणींनी शॉर्ट्स, मिनी स्कर्ट, फाटलेली जीन्स, हाफ पॅन्ट यांसारखे पश्चिमी पोशाख किंवा अंगप्रदर्शन करणारे कपडे परिधान करू नयेत.
 
 
या नियमांचे Ekvira Devi  उल्लंघन करणाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांनी ड्रेस कोडचे पालन करून मंदिराच्या शुचितेला साथ द्यावी, असे आवाहन संस्थानने केले आहे. मंदिर परिसरात यासंदर्भात सूचनाफलक लावण्यात येणार असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.मंदिर प्रशासनाने हा निर्णय भाविकांच्या श्रद्धेचा आदर राखत, परंतु पारंपरिकता व शिस्त यांची जोड जपण्यासाठी घेतला असून, सर्वांनी यास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0