भूमि अभिलेख कर्मचार्‍यांचे बेमुदत कामबंद

03 Jun 2025 21:02:04
बुलढाणा,
Indefinite strike भूमि अभिलेख विभागातील कर्मचार्‍यांच्या विविध मगाण्या मान्य न झाल्याने बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य भूमि अभिलेख कर्मचारी संघटनेच्या वतीने अप्पर मुख्य सचिव महसुल व वन विभाग यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नमूद आहे की, महाराष्ट्र राज्य भूमि अभिलेख तांत्रिक कर्मचारी संघटनेने महाराष्ट्र राज्य भूमि अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभाग यांनी पुकारलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनाला पाठींबा दिला असुन या संघटनेचे सभासद १५ मे पासुन काळ्या फिती लावुन कामकाज करीत आहेत. तसेच आज ३ जून पासुन बुलढाणा येथील भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचार्‍यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
 
 
Indefinite strike
 
भूमि अभिलेख विभागातील गट क (भूकरमापक) संवर्गाचे सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यानुसार विभागात सेवा प्रवेशासाठी तांत्रिक शैक्षणिक अर्हता बंधनकारक करण्यात आली परंतु कर्मचार्‍यांना पदानुसार व कामाचे तांत्रिक स्वरुपानुसार तांत्रिक वेतनश्रेणी लागू करण्यात आली नाही. भूमि अभिलेख विभागाचे सुधारीत आकृतीबंधाला मंजुरी देणे. भूमापकांना निश्चित प्रवास भत्ता मिळणे, मोजणी साहित्य पुरविणेबाबत व अनुदान मिळणे. विभागातील अधिकारी कर्मचार्‍यांवर पोलिस विभागाकडून होत असलेल्या कारवाया थांबवणे. Indefinite strike मोजणी नोटीससंदर्भात सुरू असलेल्या करावाई थांबवणे. रखडलेल्या पदोन्नती बाबत आदेश निर्गमित करणे. विभागातील सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची अंमलबजावणी करणे. राज्यात नवीन नगर भूमापन कर्यालय सुरू करणे या मगाण्या निवेदनाव्दारे करण्यात आल्या आहे. सरकारने तात्कळ संबधीत मागण्या मान्य कराव्या अशी मागणी कर्मचार्‍यांनी केली आहे. अन्यथा बेमुदत कामबंद आंदोलन सुरू राहिल असा इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्य भूमि अभिलेख तांत्रिक कर्मचारी संघटनेने या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.
Powered By Sangraha 9.0