मुंबई,
Paresh Rawal बॉलिवूडमधील लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायजी ‘हेरा फेरी’च्या तिसऱ्या भागाबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाभोवती नवा वाद निर्माण झाला होता. विशेषतः ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी तिसऱ्या भागाचा प्रोमो शूट केल्यानंतरही सिनेमा सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता मोठी अपडेट समोर आली असून परेश रावल पुन्हा या चित्रपटात सहभागी होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
परेश रावल यांचा ‘यू-टर्न’!
‘हेरा फेरी 3’ मध्ये पुन्हा एकदा अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांची तिकडी एकत्र येणार आहे. पहिल्या दोन भागांतील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यामुळे तिसऱ्या भागात परेश रावल नसल्याची चर्चा सुरु झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता परेश रावल यांनी एका पॉडकास्टमधून अधिकृत घोषणा केली आहे की, “सर्व वाद मिटले असून मी सिनेमात पुन्हा काम करणार आहे.”
केआरकेचा वादग्रस्त निशाणा
परेश रावल Paresh Rawal यांनी 'हेरा फेरी 3' साठी होकार दिल्याची बातमी येताच बॉलिवूडमधील वादग्रस्त समीक्षक आणि अभिनेता केआरके (कमाल राशिद खान) यांनी ट्विटरवरून त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. आपल्या एक्स (माजी ट्विटर) हँडलवर केआरकेने लिहिलं “जो माणूस लघवी पिऊन आयुष्य जगत आहे तो प्रसिद्धीसाठी काहीही करु शकतो… परेश रावल बॉलिवूडमधले सर्वात मोठे ड्रामा आहेत. त्यांना आपण मेल राखी सावंत देखील म्हणू शकतो…”केआरकेने याआधीही दावा केला होता की, परेश रावल सिनेमा सोडू शकत नाहीत आणि अक्षय कुमारविरोधात कुठलीही कारवाई करु शकत नाहीत. या पार्श्वभूमीवर त्याच्या ट्वीटची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
चाहत्यांची संमिश्र प्रतिक्रिया
एकीकडे परेश रावल Paresh Rawal यांचे पुनरागमन 'हेरा फेरी 3' मध्ये होत असल्याने अनेक चाहते आनंद व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे, केआरकेच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सोशल मीडियावर एक वेगळाच ट्रेंड सुरू झाला आहे.‘हेरा फेरी 3’ या सिनेमाकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. मूळ तिकडी पुन्हा एकत्र आल्याने हास्याची तुफान लाट येणार यात शंका नाही. मात्र, केआरकेसारख्या व्यक्तींच्या टीका आणि वादामुळे या सिनेमाची चर्चा केवळ कलात्मकतेपुरती मर्यादित न राहता, वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.