अकोला,
Gajanan Maharaj Palkhi शेगावच्या श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे भौरद वरून डाबकी रोड मार्गे शहरात बुधवारी सकाळी सातच्या वाजता आगमन झाले. यावेळी डाबकी रोड च्या दुतर्फा भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. सकाळी १०.३० वाजता पालखीचे येथील भिकमचंद खंडेलवाल महाविद्यालयात आगमन झाले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष गोपाल खंडेलवाल यांनी पालखीचे स्वागत करून श्रींचे दर्शन घेतले. यादरम्यान येथे दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली होती. Gajanan Maharaj Palkhi दुपारच्या विसाव्या नंतर पालखी मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाकडे मार्गस्थ होणार आहे. पालखीचा बुधवार व गुरुवार असे दोन दिवस शहरात मुक्काम असणार आहे.