मुंबई,
Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 छोट्या पडद्यावर आपल्या दीर्घकालीन आणि लोकप्रिय प्रवासासाठी ओळखली जाणारी मालिका ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या मालिकेचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती समोर आली असून, चाहत्यांमध्ये उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

या नव्या Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 पर्वात पुन्हा एकदा अभिनेत्री स्मृती इराणी ‘तुलसी’च्या भूमिकेत झळकणार आहे. विशेष म्हणजे, यावेळीही तिची जोडी अभिनेता अमर उपाध्यायसोबत पाहायला मिळणार आहे. मालिकेची निर्मिती प्रसिद्ध निर्माता एकता कपूर करत असून, पहिल्या सीझनप्रमाणेच दुसऱ्या पर्वातही कौटुंबिक नातेसंबंधांची गुंतागुंत मांडली जाणार आहे.स्मृती इराणीच्या मानधनाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे, स्मृती इराणी ‘तुलसी’च्या भूमिकेसाठी दर एपिसोडसाठी तब्बल १४ लाख रुपये मानधन घेत असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.दरम्यान, स्मृती इराणी सध्या Z+ सुरक्षा व्यवस्थेत शूटिंग करत असल्याची माहितीही समोर आली आहे. सेटवर कडक प्रोटोकॉल पाळले जात असून, फोन टॅपिंग आणि सेटवरील प्रवेशावर मर्यादा लावण्यात आल्या आहेत. मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, मालिकेच्या पोस्टरचे शूटिंग पूर्ण झाले असून, सध्या प्रोमो शूटिंगची तयारी सुरू आहे.
‘क्योंकी सास भी कभी बहू थी’चा पहिला भाग ३ जुलै २००० Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 रोजी प्रदर्शित झाला होता. त्यामुळे दुसरा सिझनही याच दिवशी प्रदर्शित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अद्याप अधिकृत प्रदर्शन तारीख जाहीर करण्यात आलेली नसली, तरीही या लोकप्रिय मालिकेच्या पुनरागमनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.