जाट’ आता नेटफ्लिक्सवर

05 Jun 2025 13:36:38
Jatt movie सनी देओल यांचा अॅक्शनने भरलेला आणि प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारा ‘जाट’ हा चित्रपट आता ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. १० एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जगभरात सुमारे ११० कोटी रुपयांची दमदार कमाई केली.
 
 
Jatt movie
प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलेल्या या चित्रपटाची आता नेटफ्लिक्सवर अधिकृतपणे ओटीटी रिलीज झाली असून, ५ जूनपासून ‘जाट’ हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.
 
 
या खास Jatt movie घोषणेसाठी सनी देओलने एक मजेदार व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये सनी देओल हातात कॅलेंडर घेऊन म्हणतो, “आता आपल्याला तारखांमागून तारखा द्याव्या लागतील. प्रत्येकजण विचारत आहे की जाट ' नेटफ्लिक्सवर कधी येणार?” आणि मग हसत उत्तर देतो, “जात येतोय ५ जून रोजी!”नेटफ्लिक्स इंडियानेही हा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, “सनी देओल तुमच्यासाठी एक डेट घेऊन आले आहेत, लक्षात ठेवा!”
 
 
‘जात’ Jatt movie चित्रपटाची कथा एका देसी नायकाच्या संघर्षावर आधारित आहे, जो आपली जमीन, सन्मान आणि प्रियजनांचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार असतो. दक्षिणेतील अॅक्शन शैली आणि पंजाबी रंगत असलेल्या या चित्रपटाचे प्रेक्षकांनी विशेष कौतुक केले आहे.चित्रपटाच्या दमदार अॅक्शनसह सनी देओलचा रांगडा अंदाज आता नेटफ्लिक्सवर अनुभवता येणार आहे.
Powered By Sangraha 9.0