वनक्षेत्राच्या बळकटीकरणासाठी महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणार – वनमंत्री गणेश नाईक

‘वनशक्ती २०२५’ राष्ट्रीय परिषद थाटात संपन्न

    दिनांक :05-Jun-2025
Total Views |
चंद्रपूर,
Forest Minister Ganesh Naik “राज्याच्या प्रगतीत महिलांचे योगदान मोलाचे असून, आता वनविभागातही महिलांचे नेतृत्व वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी वनक्षेत्रात महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे,” अशी घोषणा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी आज केली.
 
 
Forest Minister Ganesh Naik
‘वनशक्ती २०२५’ राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य वन विभागातर्फे चंद्रपूर येथील वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनीमध्ये ही परिषद आयोजित करण्यात आली होती. परिषदेसाठी देशभरातून वनक्षेत्रात कार्यरत महिला उपस्थित होत्या.परिषदेच्या उद्घाटन समारंभाला आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे, आमदार करण देवतळे, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, तेलंगणाचे वन बल प्रमुख डॉ. सुवर्णा, कांचन देवी, श्रीनिवास राव, संजीव गौर यांची उपस्थिती होती. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक या ऑनलाईन सहभागी झाल्या.
 
 
महिलांचा सहभाग ५१ टक्के असेल
“वनक्षेत्राच्या Forest Minister Ganesh Naik  बळकटीकरणासाठी प्रत्येक तालुक्यात एक मानद वन्यजीव रक्षक नेमण्यात येणार असून, त्यामध्ये महिलांचा सहभाग किमान ५१ टक्के असेल,” असे वनमंत्री नाईक यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी दर्जेदार वाहने व संरक्षक शस्त्रे देण्यात येणार असून, मानव-वन्यजीव संघर्षाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी इतर राज्यांच्या अभ्यासदौऱ्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.“वन क्षेत्रातून महसूल वाढविण्यासाठी पर्यटनवाढीला चालना देणारे प्रकल्प राबविण्यात येतील,” अशी संकल्पनाही वनमंत्र्यांनी मांडली.आमदार किशोर जोरगेवार यांनी ‘वन पाटील’ नेमण्याची सूचना केली, त्यास उत्तर देताना वनमंत्र्यांनी मानद वन्यजीव रक्षकांच्या नियुक्तीत महिलांना प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्ट केले. आमदार देवराव भोंगळे व आमदार करण देवतळे यांनीही परिषदेच्या आयोजनाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
 
 
महिलांच्या कार्याचा गौरव
 
 
मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी “महिलांचे नेतृत्व अधोरेखित करणाऱ्या चित्रकृती सादर करताना, महिलांच्या सहभागामुळे ‘विकसित भारत’ साकार होईल,” असे मत व्यक्त केले. अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी वनक्षेत्रातील महिलांच्या क्षमतेची प्रशंसा केली. डॉ. सुवर्णा व शोमिता बिस्वास यांनीही महिलांच्या योगदानाचे कौतुक करत परिषदेच्या आयोजनाची पार्श्वभूमी विशद केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया खाडिलकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी केले.