२१ व्या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट जाहीर : 'अनुपमा' पुन्हा अव्वल,

"ये रिश्ता..." आणि "उडने की आशा"मध्ये कडवी टक्कर

    दिनांक :06-Jun-2025
Total Views |
मुंबई,
TRP ratings टीव्ही मालिकांच्या लोकप्रियतेचा आरसा ठरणाऱ्या बीएआरसी टीआरपी रेटिंग्सचा २१ व्या आठवड्याचा अहवाल जाहीर झाला आहे. या आठवड्यात कोणता शो हिट ठरला आणि कोणता फसला, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून होते. विशेष म्हणजे टॉप-५ मालिकांमध्ये यंदा काही नवे बदल पाहायला मिळाले आहेत.
 
 

TRP ratings 
गेल्या आठवड्याप्रमाणेच या आठवड्यातही रूपाली गांगुली स्टारर ‘अनुपमा’ या मालिकेने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. या मालिकेचे टीआरपी रेटिंग २.० असून, नुकताच दाखवण्यात आलेला आर्यनच्या मृत्यूचा ट्रॅक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे दिसून येते. अनुपमाच्या आयुष्यात घडणाऱ्या नाट्यमय घडामोडींनी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.
 
 
दुसऱ्या TRP ratings क्रमांकावर ‘उडने की आशा’ ही मालिका असून, तिचे रेटिंग १.९ आहे. कंवर ढिल्लन आणि नेहा हरसोरा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेमध्ये सध्या उत्कंठावर्धक वळण पाहायला मिळत असून, निर्माते त्यात अधिक नाट्य घालण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रेक्षकही या नव्या ट्रॅक्सना चांगला प्रतिसाद देत आहेत.‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही मालिका या आठवड्यात तिसऱ्या क्रमांकावर असून, तिचे रेटिंगसुद्धा १.९ इतकेच आहे. रोहित पुरोहित आणि समृद्धी शुक्ला यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेमध्ये नुकताच सात वर्षांचा लीप दाखवण्यात आला आहे. या नवीन ट्रॅकमुळे मालिकेमध्ये नवा टर्न आला आहे आणि ती ‘उडने की आशा’ला जोरदार स्पर्धा देत आहे.
 
 
या यादीतील चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरील शोमध्ये मात्र घसरण झाली आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ आणि ‘लाफ्टर शेफ्स २’ या शोच्या टीआरपीत काहीसा घट झाल्याचे दिसते. त्यांच्या अचूक रेटिंगसाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार असली, तरीही ते टॉप-५ मध्ये आहेत.
 
 
२१ व्या आठवड्यातील टॉप-५ टीव्ही शो टीआरपीनुसार खालीलप्रमाणे आहेत :
1. अनुपमा – टीआरपी 2.0
2. उडने की आशा – टीआरपी 1.9
3. ये रिश्ता क्या कहलाता है – टीआरपी 1.9
4. तारक मेहता का उल्टा चष्मा – (टीआरपी थोडी घटलेली)
5. लाफ्टर शेफ्स २ – (टीआरपी थोडी घटलेली)
टीव्ही टीआरपीच्या या शर्यतीमध्ये पुढील आठवड्यात काय उलथापालथ होते, हे पाहणे रंजक ठरणार आहे.