मुंबई,
Thug Life कमल हासन, मणिरत्नम, त्रिशा कृष्णन आणि सिलंबरसन यांच्या बहुप्रतिक्षित 'ठग लाईफ' या चित्रपटाने गुरुवारी मोठ्या गाजावाजात प्रेक्षकांच्या भेटीला हजेरी लावली. मात्र, चित्रपटाने पहिल्याच दिवशी अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकली नाही.
तमिळ, तेलगू आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केवळ १७ कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली. ही कमाई कमल हासनच्या मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘इंडियन २’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईपेक्षाही कमी आहे. ‘इंडियन २’ने पहिल्या दिवशी २५.६० कोटींचा गल्ला जमवला होता, तरी तो चित्रपटही बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता.
'ठग लाईफ' Thug Life चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीची स्थिती तर आणखीच निराशाजनक ठरली. हा चित्रपट १ कोटी रुपयांचाही गल्ला जमवू शकला नाही, तर दुसरीकडे ‘भूल चुक माफ’सारख्या जुन्या चित्रपटाने अजूनही चांगली कमाई सुरू ठेवली आहे.चित्रपट प्रदर्शनाआधीच विविध वादांमध्ये सापडला होता. चित्रातील चुंबन दृश्य आणि कमल हासनचे कन्नड भाषेबाबत केलेले विधान यामुळे चित्रपटावर कर्नाटकात बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे त्याचा तेथील व्यवसाय पूर्णतः थांबला. इतकेच नव्हे तर, अभिनेता कमल हासनला यासाठी उच्च न्यायालयाची फटकारही बसली होती.२७० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटातून मणिरत्नम आणि कमल हासन तब्बल ३८ वर्षांनंतर एकत्र आले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिकच वाढल्या होत्या. मात्र, पहिल्याच दिवशी प्रेक्षक आणि समीक्षकांकडून मिळालेल्या नकारात्मक प्रतिक्रिया यामुळे चित्रपटाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.