रासायनिक खताची कमतरता पडू देणार नाही

जिल्हा कृषी विकास अधिकारी संजय बमनोटे

    दिनांक :07-Jun-2025
Total Views |
सरपंच संघटनेच्या मागणीची दखल
 
गिरड,
Sanjay Bamnote जिल्ह्यात सध्या युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला असून शेतकर्‍यांना तातडीने युरिया खत उपलब्ध करून देण्याची मागणी सरपंच संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीची कृषी विभागाकडून तात्काळ दखल घेतली असून शेतकर्‍यांना कोणत्याही परिस्थितीत खताची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासन कृषी विकास अधिकारी संजय बमनोटे यांनी दिले.
 
 
Sanjay Bamnote
 
खरिपाचा हंगाम सुरू असून या काळात ज्या शेतकर्‍यांच्या बांधावर पाऊस झाला की कोणतेही वाहन जात नाही अशा शेतकर्‍यांची रासायनिक खतासाठी लगबग सुरू आहे. मात्र, अशावेळी अनेक शेतकरी रासायनिक खतासाठी भटकंती करीत आहे. अशा स्थितीत शेतकर्‍यांनी आपल्या परिसरातील कोणत्या कृषी केंद्रात खताचा कोणतासाठा किती प्रमाणात उपलब्ध आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी शेतकर्‍यांनी मोबाइलमध्ये कृषक अ‍ॅप डाऊनलोड करून यात चावडी फोल्डर उघडून सर्व प्रकारची माहिती जाणून घ्यावी. Sanjay Bamnote एखाद्या कृषी सेवा केंद्र संचालकांकडे रासायनिक खताचा साठा उपलब्ध असताना तो देण्यास टाळाटाळ करीत असल्यास यासंबंधीची तात्काळ कृषी विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी संजय बमनोटे यांनी केले आहे.
 
 
जिल्ह्यात १८ हजार मेट्रिक टन युरिया उपलब्ध असल्याचे पॉश मशिनमध्ये दिसत आहे. युरियाचा पुरवठा कमी आहे. मात्र, स्थानिक पातळीवर नेमकी परिस्थिती काय आहे याची तपासणी कृषी विभागाच्या वतीने करण्यात येईल. शेतकर्‍यांना कोणत्याही रासायनिक खताची कमतरता पडू देणार नाही. Sanjay Bamnote तसेच ५-६ दिवसात जिल्ह्यात युरियाचा पुरवठा व्हावा यासाठी कृषी विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, अशी माहिती सरपंच संघटनेच्या मागणीवर संजय बमनोटे यांनी दिली आहे.