हिंगणघाट,
Matrushkatila vadache jhada तरुण भारताच्या शताब्धी तर नरकेसरी प्रकाशन संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पर्यावरण वाचविण्यासाठी जनतेत जनजागृती करण्यासाठी विविध संस्थेच्या महिलां संस्थांना वडाचे झाडाचे वितरण करण्याचा शुभारंभ ६ रोजी हिंगणघाट येथे झाला. विश्व हिंदू परिषद मातृशतीला तरुण भारत तालुका प्रतिनिधी सतिश वखरे यांनी वटवृक्षाचे रोपटं भेट दिले.
विहिंप मातृशती वर्धा जिल्हा सहसंयोजक विद्या पेंडके, मातृशतीनगर संयोजक हिंगणघाटच्या अपर्णा क्षीरसागर, जया बन्सोड, हर्षदा टोळ, शोभा पेंडके, पौर्णिमा बोडखे, रिया देशमुख, वैशाली उरकुडे, दुर्गा झाडे, माधुरी अतकर यांना वखरे यांनी सुपूर्द वडाचे झाड भेट दिले. Matrushkatila vadache jhada यावेळी विश्व हिंदू परिषदेच्या विद्या पेंडके यांनी येथील विठ्ठल मंदिर (तीन देऊळ) येथे रोपटे लावून वृक्षारोपणा बाबत जनतेत जागृती करण्याचे आश्वासन दिले. यावेळी वखरे यांनी तरुण भारतची शंभर वर्षाची परंपरा व सामाजिक दायित्व याविषयी माहिती दिली.