मुंबई,
Sanjay Turde राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलेले असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मुंबईत मोठा धक्का बसला आहे. मनसेचे मुंबईतील एकमेव माजी नगरसेवक संजय तुर्डे (Sanjay Turde) यांनी पक्षाला रामराम ठोकला असून, लवकरच ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कालिना Sanjay Turde विभागातून निवडून आलेले संजय तुर्डे हे मनसेचे मुंबईतील एकमेव प्रतिनिधी होते. त्यांच्या या निर्णयामुळे मनसेची महानगरपालिका पातळीवरील उपस्थिती शून्यावर जाणार आहे. विशेष म्हणजे संजय तुर्डे यांच्यासोबत कालिना परिसरातील काही महत्त्वाचे मनसे पदाधिकारी देखील शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे.
शिंदेंची ‘मोठी खेळी’
राज ठाकरे आणि Sanjay Turde उद्धव ठाकरे यांच्यात युती होण्याच्या शक्यतेवर चर्चा सुरू असतानाच शिंदे गटाने ही 'मोठी खेळी' करत मनसेचा एकमेव माजी नगरसेवक आपल्या गोटात ओढल्याने राजकीय भूकंप झाल्याचे बोलले जात आहे. संजय तुर्डे यांच्यापूर्वी मनसेचे इतर सहा माजी नगरसेवक – दिलीप लांडे, अश्विनी माटेकर, परमेश्वर कदम, दत्ता नरवणकर, डॉ. अर्चना भालेराव आणि हर्षला मारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र तुर्डे यांनी मनसेशी निष्ठा कायम राखली होती.
‘आता थेट बातमीच देऊ’ – उद्धव ठाकरे
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांदरम्यान उद्धव ठाकरेंनी काल स्पष्टपणे सांगितले की, “जे जनतेच्या मनात आहे ते होईल. आता संदेश नाही, थेट बातमीच देऊ.” मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अवघ्या काही तासांत उद्धव ठाकरेंनी हे मोठे विधान करत एकप्रकारे संभाव्य युतीची पुष्टीच दिली.
राज ठाकरेंची तातडीची बैठक
या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज पक्षाच्या उपाध्यक्षांची बैठक शिवतीर्थ येथे बोलावली होती. यामध्ये ते नेमका काय संदेश देणार, पुढील रणनीती काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संजय तुर्डे यांच्या निर्णयामुळे पक्षातील नाराजी, असंतोष यावर राज ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.