शिक्षण संस्थाचालक चरण चेटूलेला अटक

- बाेगस प्रस्ताव पाठवून बनवले मुख्याध्यापक

    दिनांक :07-Jun-2025
Total Views |
नागपूर,
Charan Chetule arrested शालार्थ आयडी घाेटाळ्याला आता नवे वळण लागले असून पाेलिसांनी पहिल्यांदाच शिक्षण संस्थेच्या संस्थाचालकाला अटक केली. चरण नारायण चेटूले (63) असे अटक केलेल्या संचालकाचे नाव आहे. प्रकृतीच्या कारणावरून संस्थाचालकाला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या कारवाईमुळे शिक्षणक्षेत्रात व विशेषत: संस्थाचालकांच्या वतुर्ळात खळबळ उडाली आहे. शालार्थ आयडी घाेटाळ्यातही एसआयटीकडून संस्थाचालकांना अटक करण्याचे सत्र सुरु हाेणार आहे.
 
Charan Chetule arrested
 
चरण नारायण चेटुले (63, भंडारा) हा भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे राजश्री शिक्षण संस्था व नवाेदय शिक्षण संस्था या दाेन संस्थांमध्ये अध्यक्ष आहत. आराेपी मुख्याध्यापक पराग पुंडके याने नागपूर येथील एस. के. बी. उच्च प्राथमिक, माध्यमिक विद्यामंदिर, यादवनगरची बाेगस व बनावट कागदपत्र तयार करून त्या आधारावर उपसंचालक उल्हास नरड यांनी आर्थिक व्यवहार करून चुकीच्या पद्धतीने राजश्री शिक्षण संस्थेच्या शाळेत मुख्याध्यापक पदासाठी मंजुरी दिली. मुन्ना वाघमारेच्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला हाेता. Charan Chetule arrested पाेलिसांनी या घाेटाळ्यात पराग पुंडके, उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह सात जणांना ताब्यात घेतले हाेते. या प्रकरणात पराग पुंडकेच्या कागदपत्रांवर चेटुलेची स्वाक्षरी हाेती. पाेलिसांनी याची खातरजमा केल्यानंतर गुरुवारी रात्री भंडाèयातून चेटुलेला ताब्यात घेतले. त्यांची बायपास सर्जरी झाली असल्याने नागपुरात आणल्यावर अगाेदर मेयाे व त्यानंतर मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तेथून सुटी मिळाल्यावर पाेलिसांकडून सखाेल चाैकशी करण्यात येणार आहे. पाेलिसांनी न्यायालयासमाेर पाेलिस काेठडीची मागणी केली आहे.
वाढदिवशीच ठाेकल्या बेड्या
चरण चेटुले याचा गुरुवारी 63 वा वाढदिवस हाेता. त्यामुळे त्याच्या वाढदिवसाची जंगी पार्टी ठेवण्यात आली हाेती. सदर पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक मनिष ठाकरे यांना या पार्टीची माहिती मिळाली. त्याच दिवशी सदर पाेलिसांनी छापा घालून चरण चेटूले याला ताब्यात घेतले. पुंडकेच्या कागदपत्रांवर त्यांची स्वाक्षरी हाेती. याअगाेदर पाेलिसांनी राजू केवलराम मेश्राम या एका संस्था सचिवालाही अटक केली हाेती.
‘ताे’ पाेलिस अधिकारी काेण
शिक्षण विभागातील एका सेवानिवृत्त अधिकाèयाला अटकेची भीती दाखवून 25 लाख रुपयांची मागणी केली हाेती. अटकेच्या भीतीपाेटी त्यांनी पाच लाख रुपये एका पाेलिस अधिकाèयाला दिले हाेते. त्यानंतर त्या पाेलिस अधिकाèयांने उर्वरित पैसै मागण्यासाठी तगादा लावला. त्यामुळे सेवानिवृत्त अधिकाèयाने एसीबीकडेे लेखी तक्रार केली. त्यानंतर त्यांनी पाेलिस दलातील वरिष्ठ अधिकाèयांकडे तक्रार केली. अखेर त्यांच्या तक्रारीमुळे ताे पैसे घेणारा अधिकारी घाबरला. वरिष्ठांकडून शिस्तभंगाची कारवाई हाेण्याच्या भीतीने त्या पाेलिस अधिकाèयाने घेतलेले पाच लाख रुपये परत केल्याची चर्चा आहे. मात्र, ताे पाेलिस अधिकारी काेण, याबाबत उलटसुलट चर्चा आहे.